महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा , जागर महापुरुषांच्या विचारांचा !
विनम्र आवाहन
पुरंदर तालुक्यातील तमाम नागरीकांना नम्र आवाहन करण्यात येते की, उद्या शुक्रवार दि. ५/ ५ / २०२३ रोजी सकाळी १०- ३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत , डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सासवड येथे, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघठन व युगपुरुष जंयती उत्सव समिती तालुका पुरंदर जिल्हा पुणे, यांच्या वतीने, जगत वंदन जगतगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, समाजसुधारक फातीमा शेख, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आदिवासी नेते बिरसा मुंडा, या सर्व महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा , जागर महापुरुषांच्या विचारांचा या मथळ्याखाली आयोजित केला आहे, सदर जयंती सोहळ्याचे अध्यक्षस्थान यशस्वी उद्योजक चित्रपट निर्माते, सामाजिक कार्यकर्ते, व युनायटेड इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. सहिंद्र भावले, हे भुषविणार असून प्रमुख वक्त्या म्हणून, पुणे विद्यापीठाच्या व्याख्याता एकपात्री कलाकार लेखिका प्रा. स्नेहा गायकवाड मॅडम या आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार मा. संजयजी जगताप, माजी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री मा. विजयबापू शिवतारे, माजी आमदार मा. अशोकराव टेकवडे , पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती मा. बाबाराजे जाधवराव, एवरेस्ट स्पन पाईप इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा उद्योजक अविनाश जगताप, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर प्रमुख उपस्थितीत सासवड जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विविध पक्ष संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी , पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष पदाधिकारी व विविध सामाजिक राजकीय पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी , व वरील सर्व महापुरुषांच्या विचारांशी नतमस्तक होणारे अनुयायी सदर सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत, आपणही या जागर महापुरुषांच्या विचारांचा या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून , या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे ही नम्र विनंती,
कळावे
आयोजक
विष्णूदादा भोसले, सुनिल जगताप, डॉ . विनायक गायकवाड, बळीराम सोनवणे, राहुलदादा गायकवाड, सुहास बेंगळे, ज्ञानोबा वाघमारे, गुलाबराव सोनवणे, नामदेव नेटके, पुरुषोत्तम पवार, रविंद्र जगताप, विजय जगताप, सुनिल रणपिसे, सुनिल अ. जगताप, व मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघठन व युगपुरुष जंयती उत्सव समितीचे सर्व विश्वस्त मान्यंवर,