राज्यस्तरीय महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्काराने विविध महिला सन्मानित
राज्यस्तरीय महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्काराने विविध महिला सन्मानित
नाशिक: श्रमिक बहुउद्देशीय महिला मंडळ व यश क्लासेस मेरी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सिनेतारका कु.सायली पाटील (जैतर फिल्म), डॉ.प्रतिभा वाघ,व प्रा.सीमा सोनवने यांचे हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आली.कार्यक्रमाच्या आयोजिका वैशाली सपकाळे यांनी कन्यारत्न पुरस्काराचे स्वरूप स्पष्ट केले. सायली पाटील यांनी वैशाली ताईच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील फक्त कन्या असलेल्या शामल मोरे ,संगीता जाधव ,वर्षा गवारे, तिलोत्तमा बाविस्कर, पल्लवी भावसार, रत्नप्रभा गर्गे, सुरेखा पाटील, रत्ना पाटील, दिपाली आहिरे, वृषाली बच्छाव, सुनीता बत्तीसे, शारदा भारुडे, वैशाली पवार ,नीलम कुमावत ,अनिता इशलापल्ले, दिव्या भदाणे ,शिलालेखा डलोड, मोनाली केदारे, लक्षशिला निकाळे ,चंद्रशिला गांगुर्डे ,कु. दुर्गा गुंजाळ, संगीता गुंजाळ,प्रिती बच्छाव, जयश्री शिंदे, भारती बनछोडे, कल्पना पवार ,शर्वरी कुलकर्णी ,साक्षी मोहोणी, निशा चव्हाण, दिपाली खैरनार ,अर्चना परदेशी, सुजाता कवठेकर, पल्लवी कुलकर्णी, वैशाली चौधरी, रेखा देशपांडे, वनिता शिंदे, राणी शर्मा, कविता पाटील, नेहा ढोकणे ,शारदा सूर्यवंशी, वैजवंती चौधरी, मेगा शिंपी,सविता भालेराव, प्राजक्ता देशपांडे या महिलांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
नुपूर सपकाळे, मैथिली सपकाळे,ज्योती जार्ज,सारा हिले, वैशाली ताजणे, कल्पना सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमा कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन किशोर सपकाळे यांनी केले.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.