शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयाची एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांचे संचालक मंडळावर RRCची कारवाई करा
अहमदनगर : शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयाची एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांचे संचालक मंडळावर RRCची कारवाई करा तसेच शेतकऱ्यांना थकित FRP, 15 टक्के व्याजासह द्या, शेतकरी संघटनेचे जनक श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांचे नाव घेऊन शेतकरी संघटनेची बदनामी करणाऱ्या युटेक गजानन शुगरचे कार्यकारी संचालक चेअरमन रवींद्र बिरोले यांच्यावर यांच्यावर आयपीसी कायद्यानुसार कारवाई करावी बाबत अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर सिद्धाराम सालीमठ तसेच नाशिक विभागाचे आरजेडी डॉ प्रवीण लोखंडे यांना संघटनेच्या वतीने घेराव ठीया आंदोलन करण्यात आले.. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नगर RHD कार्यालयातच आंदोलन सुरू राहील असा इशारा संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी RJD डॉक्टर प्रवीण लोखंडे यांना दिला यावेळी संघटनेचे प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, युवक अध्यक्ष दीपक फाळके, अनिल भांडवलकर, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील लोखंडे, उपाध्यक्ष बाळासाहेब वर्पे,नेवासा तालुकाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, दादासाहेब नामदे युवक अध्यक्ष नेवासा, दौलतराव गंनगे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष, आणि संपर्कप्रमुख संदीप गवारे , शेतकरी उपस्थित होते