केजरीवालांना शिक्षा झालीच पाहिजे; अण्णा हजारेंचे कठोर बोल!
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना (रविवारी, १६ एप्रिल) रोजी कथित मद्य घोटाळाप्रकरणात सीबीआयने त्यांना चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स बजावले आहे.
आपकडून मात्र ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर तपास यंत्रणाकडून ही केजरीवाल यांच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा केला आहे. सबळ पुराव्यांचा आधारेच समन्स बजावण्यात आल्याचे, सीबीआयने दावा केला आहे.
दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता केजरीवालांच्या या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना आण्णा हजारे म्हणाले, “यामध्ये काही दोष असतील तर म्हणूनच तर चौकशी होत आहे. त्यांच्याकडून चूक घडली असेल तर शिक्षा ही व्हायलाच हवी.
अण्णा हजारे पुढे म्हणाले, “मी याआधीही मी त्यांना पत्र लिहून कळवले होते, तुम्ही दारूबद्दल इतके सकारात्मक का विचार करत आहात. चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा विचार केला गेला पाहिजे. केवळ पैसा मिळवण्यासाठी काहीही करणे योग्य नाही. दारूने कधीच कुणाचेही भले झाले नाही. सीबीआयने काहीतरी आढळून आले असेल, त्यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे. केजरीवाल दोषी आढळल्यास शिक्षा ही झालीच पाहिजे, ” असे केजरीवाल म्हणाले.
“अरविंद केजरीवाल माझ्यासोबत होते तेव्हा, त्यांना सांगत असे की, विचार आणि आचरणात शुद्धता ठेवा. सत्याच्या मार्गावर जा, अयोग्य गोष्टींचा कलंक नसावा. आज सिसोदिया सारखा माणूस जेलमध्ये आहे. याचे फार वाईट वाटते. समाज आणि देशासाठी आपण नेहमीच चांगले आचरण करावे,” असे अण्णा हजारे म्हणाले.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
केजरीवाल यांच्याविरोधात सीबीआयकडे पुरावे -ईडीच्या दावा केल्यानुसार, समीर महेंद्रू हे विजय नायर यांच्याशी संबंध जोडून काम करत होता. यामध्ये राजकारणी आणि मद्यविक्रेत्यांसोबतच्या खूपदा बैठका झाल्या होत्या. देशाच्य़ा राजधानीतील दारू धोरणाबद्दल केजरीवालांनी आंध्र प्रदेश येथील, खासदार मागुंता श्रीनिवासलू रेड्डी यांची भेट घेतली होती, अशी माहितीही ईडीने सांगितली आहे.
तसेच, दोन मुख्य साक्षीदारांनी सीबीआयला सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या हजेरीत उत्पादन शुल्क धोरणाची मसुदा प्रत उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला देण्यात आली आणि यानंतरच त्याची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा केला.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !