जयभीम महोत्सव सन्मान सोहळा 2023 निमित्ताने पालीमकर ,ढोले, गांडगे ,झोडगे सन्मानित..
जयभीम महोत्सव सन्मान सोहळा 2023 निमित्ताने पालीमकर ,ढोले, गांडगे ,झोडगे सन्मानित…!!!
प्रतिनिधी (बीड):-जानतात ते संविधान, मानतात ते संविधान
त्यांचा आहे जयभीम महोत्सवात दि.14/04/2023 रोजी सन्मान सोहळा संपन्न झाला.यामध्ये यावर्षी समाजसेवक प्रविण पालीमकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले पाटील, प्रा. गांडगे संदिप, रुग्णसेवक शरद झोडगे याना सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केल्या बद्दल सन्मानित केले.
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव, क्रांतिसूर्य, संविधान निर्माते,प्रतांड कायदेपंडित, बोधीसत्व,विश्वभुषण , विश्वरत्न या बहु उपाधीने क्रियाशील ठरलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 (एकशे बत्तीसाव्या) जन्मदिनाच्या औचित्याने दि.14/04/2023 रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दिव्यांग कर्मचारी संघटना तहसील कार्यालय बीड येथे सकाळी.10:20 वा जयभीम महोत्सव सन्मान 2023 सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. म्हणून सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीड प्रभारी तहसीलदार मा.श्रीयुत. सुहासजी हजारे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मनिषा तोकले-तांगडे , पब्लिक वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी तथा संपादक श्रीयुत सुनिल जाधव , सकाळ दैनक वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी श्रीयुत.दत्ता देशमुख व जिल्हा शासकीय बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीयुत अशोक तांगडे,सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे पञकार उत्तम ओव्हाळ, पञकार कुष्णा शिंदे, समाजसेवक सातिराम ढोले , डॉ शेख मुबारक ,सतिष जाधव या महनीय व्यक्तींची उपस्थित
होते.या सर्व मान्यवरांच्या हस्ते समाजसेवक प्रविण पालीमकर,सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले, प्रा. गांडगे संदिप,रुग्णसेवक शरद झोडगे या राज माता जिजाऊ मासाहेब प्रतिमा भेट देऊ सन्मानित करण्यात आले
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !