पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून भररस्त्यात दाम्पत्याचे अमेरिकन डॉलर लुबाडले
पुणे: पादचारी दाम्पत्याला भर रस्त्यात अडवून पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवले. तुमच्याजवळ गांजा असल्याचे सांगून बॅग तपासण्याच्या पाहण्याने जवळपास तीन लाख रुपये चोरून नेले. कोंढवा भागात वेलकम हॉल चौकात ही घटना घडली. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलखदर अब्दुल ओमर अलहखैरी यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये रात्री जेवण करून घरी परत जात होते. वेलकम हॉल चौक येथून पायी जात असताना मोटारीतून तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांच्यातील एकाने पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून फिर्यादीच्या जवळ असलेल्या बॅगेत गांजा असल्याचे सांगितले. त्यांनी फिर्यादीची बॅग तपासण्यासाठी घेतली आणि हाचलाखीने त्यातील चार हजार अमेरिकन डॉलर काढून घेतले. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !