ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

मृत्यूला सामोरे जाताना माणसाच्या मनात सर्वप्रथम कोणती गोष्ट येते? कोणाची आठवण येईल?


मृत्यू एक ना एक दिवस येणारच आहे. मृत्यूला सामोरे जाताना माणसाच्या मनात सर्वप्रथम कोणती गोष्ट येते? कोणाची आठवण येईल? याचे उत्तर अद्याप कोणाकडेही नसेल.

मात्र, अमेरिकेतील काही डॉक्टरांनी यावर एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं , की बहुतेक लोक मरण्यापूर्वी कोणते दोन शब्द बोलतात. डेली मेलच्या वृत्तानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या डॉ मिना चांग यांनी सांगितले की, बहुतेक रुग्ण म्हणतात: ‘मला कोणताही पश्चाताप नाही’. नर्स ज्युली मॅकफॅडन म्हणाली की वृद्ध लोक सहसा कुटुंबापासून विभक्त झाल्याबद्दल किंवा जास्त काम केल्याबद्दल खेद व्यक्त करतात.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

आपल्या आई आणि वडिलांचं खूप आधीच निधन झालं असलं तरी त्यांची आठवण काढतात. बऱ्याच लोकांना एक्स बॉयफ्रेंडदेखील आठवतात, जरी त्यांनी त्यांना वर्षानुवर्षे पाहिले नसले तरीही. दोन्ही डॉक्टर अत्यंत आजारी असलेल्या आणि कधीही मृत्यूची शक्यता असलेल्या लोकांची काळजी घेतात,. त्यांनी अनेक लोकांना आपल्या डोळ्यांसमोर शेवटचा श्वास घेताना पाहिलं आहे.

डॉ चांग यांच्या मते, अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण येते. ते त्यांना आय लव्ह यू म्हणतात. माफी मागतात आणि मी तुला माफ केलं असं म्हणतात. काही लोक अलविदा असे शब्दही वापरतात.

डॉक्टर चांग म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणं, त्यांना आधार देणं हा खूप खास क्षण असतो. आम्ही त्या क्षणाचा एक भाग बनतो यासाठी आम्ही भाग्यवान आहोत. लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील नर्स ज्युली मॅकफॅडन यांनी सात वर्षांहून अधिक काळ हॉस्पिस केअरमध्ये काम केले आहे आणि 15 वर्षांहून अधिक काळ परिचारिका आहे. जुली तिचे अनुभव Tiktok वर शेअर करते.

तिचे आता 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि सुमारे 13 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ज्युलीने सांगितले की, मृत्यूपूर्वी, तिला तिच्या बहुतेक रुग्णांच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीत बदल झाल्याचे लक्षात आले. याशिवाय त्वचेचा रंग बदलणे, ताप येणे, जवळच्या आणि प्रिय व्यक्तींची नावे वारंवार येणे, अशी लक्षणेही दिसून आली. दुसर्‍या व्हिडिओमध्ये, ज्युली म्हणते की मरण्यापूर्वी बहुतेक रुग्णांना सावली दिसू लागते. सावलीत त्यांना त्याचे मृत जवळचे लोक दिसतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button