सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकरी संवाद यात्रेला पुणे येथून सुरुवात
पुणे : (आशोक कुंभार )शेतकरी संवाद यात्रा, पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले व महिला शिक्षण चळवळीच्या पहिल्या मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकरी संवाद यात्रेला पुणे येथून सुरुवात करताना संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे व पदाधिकारी
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने , राज्य अन्न आयोग व उच्च न्यायालयाकडे दाखल केलेल्या याचीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचा विद्युत पुरवठा यापुढे कोणत्याही कारणास्तव, गत 63 वर्षाचे कृषी पंपाचे वीज बिल थकीत असले तरी, तो महावितरणला यापुढे कदापीही खंडित करता येणार नाही. हा ऐतिहासिक निर्णय आम्ही आमच्या संघटनेचे जनक श्रद्धेय युगपुरुष, शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी साहेब यांच्या चरणी समर्पित करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकाही पक्षाने जे कार्य केले नाही ते आपण संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे विधीज्ञ अजय गजानन तल्हार व शिल्पाताई गजानन तल्हार टीम वकील सहकारी बंधूंच्या माध्यमातून मिळवलेला आहे याची तुम्ही सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे. यापुढे तुमच्या कृषी पंपाचे विजबिल थकले तरीही वीज पुरव खंडित होणार नाही, हा ऐतिहासिक निकाल मी राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या कडे सुपूर्त करत आहे.
विठ्ठल पवार राजे.
अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक,
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना, संपूर्ण भारत, महाराष्ट्र राज्य