ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता


मराठवाडा :राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून सहा मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान मराठवाड्यातील (Marathwada) छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह परभणी जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या गव्हाची काढणी सुरु असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोबतच या पावसाचा इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात 5 तसेच 6 मार्चला तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा शनिवारी पाऊस होईल. तर 7 मार्चला तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या शक्यता पावसाची आहे.

जालना जिल्ह्यात 7 मार्चला तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात 7 मार्चला तुरळक ठिकाणी ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात 5 ते 7 मार्चदरम्यान गडगडाटासह हलक्या स्वरुपाच्या हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पुढील पाच दिवस वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. वनामकृविच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने हा हवामान सल्ला दिला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु आहे. तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गव्हाची काढणी केली जात आहे. मात्र अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर गव्हाचे पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहताना मिळत आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेले पीक आता काढणीला आले असतानाच, अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा नवीन संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

आधीच संकटात त्यात आता अवकाळीचं संकट

यावर्षी शेतकऱ्यांवरील संकट काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण खरीप हंगामात सुरुवातीला अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले. शेतात अक्षरशः पाणी तुंबल्याने पीके वाहून गेली होती. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने, आता रब्बीत काहीतरी हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button