बीडमहाराष्ट्र

बीड : बारावी विज्ञान शाखेत अवघड विषयांमधील गणित हा देखील विषय आहे. शुक्रवारी (ता. तीन) गणिताच्या पेपरला ३१४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. दरम्यान, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे व पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एकाच वेळी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.


जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक परीक्षा केंद्रांना भेटी देत असल्याने, भेटी दिलेल्या केंद्रांसह जिल्ह्यात देखील ही वार्ता शैक्षणिक वर्तुळात पसरली आणि शिक्षक व विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी च्या परीक्षा मागील आठवडाभरापासून सुरु आहेत. जिल्ह्यात ३८९२८ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून ही परीक्षा जिल्ह्यात १०१ परीक्षा केंद्रांवर होत आहे.

जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक परीक्षा केंद्रांना भेटी देत असल्याने, भेटी दिलेल्या केंद्रांसह जिल्ह्यात देखील ही वार्ता शैक्षणिक वर्तुळात पसरली आणि शिक्षक व विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी च्या परीक्षा मागील आठवडाभरापासून सुरु आहेत. जिल्ह्यात ३८९२८ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून ही परीक्षा जिल्ह्यात १०१ परीक्षा केंद्रांवर होत आहे.

दरम्यान, १२ वी विज्ञान शाखेत गणित हा अवघड विषयांपैकी एक विषय आहे. शुक्रवारी गणिताचा पेपर होता. गणिताच्या पेपरला एकूण १५५८३ विद्यार्थी असून १५२६९ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर, ३१४ विद्यार्थी जिल्हाभरात या परीक्षेला अनुपस्थित होते.

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी १५ परिरक्षक कार्यालयातून कामकाज सुरू आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. २९८ शाळांतील विद्यार्थ्यांचा या परिक्षेत समावेश आहे.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे व पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यांनी शहरातील चंपावती विद्यालयातील परीक्षा केंद्रासह बेलखंडी आणि पाटोदा तालुक्यातील निरगुडी येथील परीक्षा केंद्राला भेट दिली.

अधिकाऱ्यांची गाडी पाहून काही वेळ केंद्रांवर नियुक्तीवर असलेल्या शिक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. दीपा मुधोळ – मुंडे यांनी परीक्षा केंद्रांत जाऊन स्वत: विद्यार्थ्यांची तपासणीही केली.१५८२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

जिल्हा परिषदेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची इस्रो अंतराळ केंद्र व नासा या अमेरिकन संशोधन केंद्राला भेटीसाठी केंद्रानंतर शुक्रवारी (ता. तीन) तालुकास्तरावर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला १५८२ विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके परीक्षा केंद्रावर ठाण मांडून बसले होते.

केंद्रस्तरीय परीक्षेला जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीचे २२६६१ विद्यार्थी बसले होते. त्यामधून केंद्र निहाय १० विद्यार्थी गुणानुक्रमे निवडले आहेत. यासाठी शुक्रवारी तालुकास्तरीय परीक्षा शिस्तबद्ध व पारदर्शक पार पडली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीकांत कुलकर्णी यांनी बीड तालुक्याच्या केंद्रास भेट देऊन पाहणी केली. प्रत्येक तालुक्यातून १० विद्यार्थ्यांची निवड होणार असून त्यांची परीक्षा जिल्हा स्तरावर १० मार्च २०२३ रोजी होणार आहे.

एकूण १६१५ विद्यार्थ्यांपैकी १५८२ परीक्षेस उपस्थित होते. त्यातून ११० विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांची परीक्षा १० मार्चला होणार आहे. त्यापैकी ३३ विद्यार्थी पात्र ठरणार असून परीक्षा केंद्रावर गट शिक्षण अधिकारी श्रीराम टेकाळे, प्रणिता गंगाखेडकर, राहुल चाटे आदी कर्मचारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button