VIDEO :संदीप पाठकने आज्जींना दिली लिफ्ट, नंतर असं काही बोलला की आज्जीबाईंना आलं रडू..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


संदीप पाठक अगदी साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे. त्यामुळे लोकांच्या भावना, दु:ख तो समजू शकतो.

इतरांची सहजतेने मदतही करतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात तो एका आज्जीबाईंना त्यांच्या गावी सोडतो. गावी सोडल्यानंतर संदीपच्या एका वाक्याने आज्जाींच्या डोळ्यात पाणी तरळतं.

अभिनेता संदीप पाठक त्याच्या कारमधून शूटिंगला निघाला होता. तेव्हा वाटेत त्याला एक आज्जी दिसल्या. आज्जीबाईंना बघून संदीप गाडी थांबवतो आणि विचारतो, ‘कुठे जायचं तुम्हाला?’ त्यावर आज्जी म्हणतात, ‘शेलू ला जायचं. एसटी रिकामी नाही’. तेव्हा संदीप स्वत: आज्जींना शेलू या त्यांच्या गावापर्यंत सोडतो. गाडीतून उतरल्यावर संदीप जे म्हणतो ते ऐकून आज्जींच्या डोळ्यात चटकन् पाणी येतं. संदीप म्हणतो, ‘मला आज असं वाटलं की गाडी घेतल्याचं चीज झालं आज.’ हे ऐकून आज्जी म्हणतात ‘मलाही वाटलं माझं लेकरुच…’ आणि त्यांना रडू कोसळतं. यावर संदीप सांगतो, काही महिन्यांपूर्वीच आज्जींच्या मुलाचा अपघात झाला असं त्यांनी मला प्रवासात सांगितलं. आता मलाच मुलगा समजा असं तो आज्जींना म्हणतो, काही खाणार का पाणी देऊ का अशी त्यांची विचारपूसही करतो. त्यांचे आशिर्वाद घेतो आणि त्यांना घरी सोडतो.

संदीपचा हा व्हिडिओ खूपच भावूक करणारा आहे. मात्र त्याने त्या आज्जीबाईंची नि:स्वार्थीपणे केलेली मदत बघून सर्वच त्याचे कौतुक करत आहेत. एखाद्याला आपलंसं करणं, त्यांच्याशी प्रेमाने बोलणं, त्यांचं दु:ख समजून घेणं हे खरोखरंच किती गरजेतं आहे हेच संदीपने या घटनेतून नकळतपणे शिकवलं आहे.