वेरूळ लेण्यांच्या कलेचे जी-20 शिष्टमंडळाकडून कौतुक
वेरूळ लेण्यांच्या कलेचे जी-20 शिष्टमंडळाकडून कौतुककौतुककौतुक
औरंगाबाद : (जिमाका) जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी येथे जी-20 (W-20) शिष्टमंडळाने भेट दिली. लेण्यांची पाहणी करत कैलास मंदिर आणि कोरलेल्या विविध लेण्या, कलाकुसर आदींचे कौतुकही शिष्टमंडळाने केले. तसेच वेरूळ लेण्या पाहून शिष्टमंडळाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
शिष्टमंडळाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पाहणी दरम्यान विविध देशांच्या प्रतिनिधींना त्यांच्या भाषेत वेरूळ लेणीबाबत सविस्तर माहिती गाईड यांनी दिली. माहिती ऐकून व कलेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तत्कालीन कलाकृती निर्मितीबद्दल आश्चर्यही शिष्टमंडळाने व्यक्त केले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा प्रशासन, पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदींचीही यावेळी उपस्थिती होती.