ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

निवडणुकांनंतरचा पहिला एक्झिट पोल, कोण मारणार बाजी?


कसबा पेठ आणि चिंचवड या दोन पोटनिवडणुकींसाठी रविवारी मतदान पार पडलं. यानंतर सोमवारी इशान्य भारतात मेघालय आणि नागालँड विधानसभेसाठी मतदान झालं, त्याआधी 16 फेब्रुवारीला त्रिपुरामध्येही मतदान पार पडलं.

या तीनही राज्यांच्या निवडणुकींचा तसंच महाराष्ट्रातल्या पोटनिवडणुकींचा निकाल 2 मार्चला लागणार आहे. या निकालाआधी इशान्य भारतातल्या तीनही राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. मेघालय आणि नागालँडमध्ये प्रत्येकी 59-59 जागांवर तर त्रिपुरामध्ये 60 जागांसाठी मतदान पार पडलं. मेघालय आणि नागालँडमध्येही विधानसभेच्या 60-60 जागा आहेत, पण दोन्ही राज्यांमध्ये एक-एक उमेदवाराचं निधन झाल्यामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली.

त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत ऍक्सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलच्या पहिल्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्रिपुरामध्ये भाजपला 36-45 जागा, डाव्यांना 6-11 जागा, तृणमूल काँग्रेसला 9-16 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मेघालयमध्ये त्रिशंकू विधानसभेच्या शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. मेट्रिजच्या एक्झिट पोलनुसार मेघालयमध्ये सत्ताधारी एनपीपीला 21-26 जागा, टीएमसीला 8-11, भाजपला 6-11, काँग्रेसला 3-6 तर इतरांना 10-19 जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

मेट्रिजच्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये नागालँडमध्ये भाजपला 35-43, एनएफपीला 2-5, एएनपीला 0-1, काँग्रेसला 1-3 आणि इतरांना 6-11 जागा मिळण्याची शक्यता आहे. इटीजीच्या एक्झिट पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपला 24 जागा, सीपीआय (एम) काँग्रेस आघाडीला 21 जागा तर क्षेत्रीय पक्ष असलेल्या टीपरा मोथाला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. ऍक्सिस-माय इंडिया एक्झिट पोलनुसार मेघालयमध्ये सत्ताधारी एनपीपीला 18-24 जागा, काँग्रेसला 6-12, भाजपला 4-8, काँग्रेसला 6-12 जागा मिळतली, म्हणजेच कोणताच पक्ष 31 जागांच्या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. जन की बातच्या सर्वेनुसार मेघालयमध्ये एनपीपीला 11-15 जागा, काँग्रेसला 6-11 जागा, भाजपला 3-7 जागा आणि इतरांना 5-12 जागा मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या या आकडेवारीनुसार त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा तर मेघालयमध्ये त्रिशंकू विधानसभा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button