आनंदाची बातमी :20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार 13 वा हप्ता
इकेवायसी पूर्ण न केलेल्या राज्यातील सुमारे २० लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत १४ व्या
हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांनी इकेवायसी आणि बँक खाते आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे. ही सूट फक्त १३ व्या हप्त्यासाठीच देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी केंद्र
सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. १३ व्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने खाते सत्यापित करण्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक होते.
मात्र ही मुदत उलटून गेल्या नंतरही राज्यात सुमारे २० लाख ५६ हजार शेतकऱ्यांचे इकेवायसी करणे प्रलंबित आहे.इकेवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १३ व्या हप्त्यापुरती ही अट
शिथिल करण्यात आली असून येत्या सोमवार २७ फेब्रुवारी रोजी या २० लाखांसह राज्यातील ८१ लाख २९ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती उपायुक्त (कृषी गणना) गणेश घोरपडे दिली.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ईकेवायसी आणि बँक खात्याचे आधार सिडिंग झाल्याची खात्री करावी असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता सोमवारी जारी केला जाईल.
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये १० लाख शेतकऱ्यांना १२ वा हप्ता म्हणून सुमारे ८ कोटी रुपये जारी
करण्यात आले. तर आता १३ व्या हप्त्याची रक्कम देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी अजूनही ई केवायसी केलेले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आता केवायसी करण्यासाठी पुढे सरसावले असल्याचे सांगण्यात आले आहे.
ई-केवायसी अपडेट करण्याचे आहेत दोन मार्ग पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी इकेवायसी पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन आणि बायोमेट्रिक पद्धती वापरू शकतात. पीएम किसान योजनेच्या वेबसाइटनुसार
(pmkisan.gov.in) पात्र शेतकरी वन टाइम पासवर्डद्वारे (ओटीपी) स्वतः इकेवायसी पूर्ण करू शकतात. तर, बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसीसाठी लाभार्थीला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जावे लागेल.या कारणामुळे अर्ज प्रलंबित
एकदा वापरलेला मोबाईल क्रमांक परत वापरता येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे मोबाईल नसल्यास त्याने दुसऱ्याचा मोबाईल क्रमांक ओटीपीसाठी दिल्यास मूळ मोबाईल धारकाला परत तोच मोबाईल क्रमांक वापरता येत नाही.
गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरवर शेतकरी जात नाहीत. यासाठी जनजागृती केली जात असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. त्यामुळे आता माहिती अपडेट करावी.दरवर्षी मिळतात ६ हजार रुपये पीएम किसान योजना ही मोदी सरकारची
महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांना दर वर्षाला ६ हजार रुपये तीन महिन्यांच्या अंतराने येतात. ही योजना सुरू होऊन आता चार वर्ष पूर्ण होतील. या योजनेचा १३ वा हप्ता अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नव्हता.
मात्र, आता हा हप्ता मिळणार असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.