मुख्यमंत्री, राज्यपालांचे घर फोडणारा ‘रॉबिनहूड’ पुणे पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : ( आशोक कुंभार )देशातील अनेक राज्यात घरफोडी करणारा, मुख्यमंत्री, राज्यपालांचे घर फोडणाऱ्या ‘रॉबिन हूड’च्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. गुगलवर सर्च करुन हाय प्रोफाईल बंगले, उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी करणारा रॉबिन हूड उर्फ मोह्ममद इरफान (३३, रा.
बिहार ) याला पुण्यात अटक करण्यात आली आहे.
‘रॉबिनहूड’चे साथीदार शमीम शेख (रा. ३४,बिहार), अभ्रार शेख (५० ),राजू म्हेत्रे (५० ,दोघे रा. धारावी ,मुंबई) यांनाही अटक केली आहे. या आरोपींवर उत्तर प्रदेश,दिल्ली, बिहार, पंजाब गोवा, तामिळनाडू येथे ६९ गुन्हे दाखल आहेत. चोरी केलेल्या पैशातून ‘रॉबिनहूड’ने गावाकडे विकासकामे केली असल्याची माहिती आहे. ‘उजाला’ या टोपन नावाने त्याचा बिहारमध्ये वावर आहे.
या आरोपीकडून एक कोटी एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या तपासात तामीनाळनाडूचे मुख्यमंत्री, गोव्याच्या राज्यपालांचेही घरही या आरोपींनी फोडल्याचे समोर आले आहे.यात मुख्य आरोपी हा रॉबिन हूड उर्फ मोह्ममद इरफान आहे.
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे रॉबिडहूडचे तीन साथीदार सुनील यादव, पुनीत यादव आणि राजेश यादव (सर्व रा.गाजियाबाद ) यांना तमिळनाडू पोलिसांनी अटक केली होती, या घटनेत रॉबिनहूड हा फरार झाला होता. या आरोपींनी गोव्याच्या राज्यपालांच्या घरीही चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
२८ जानेवारी रोजी रॉबिनहूड हा कारागृहातून सुटलेला होता. त्यानंतर त्याने चेन्नई, विशाखापट्टनम, पुणे येथे चोरी करून तो दिल्लीस गेला. त्याच्या ताब्यातून पुण्यात चोरलेली तीन महागडी घड्याळे आणि विशाखापट्टनम येथे चोरलेली सात किंमती घड्याळ पुणे पोलिसांनी जप्त केली आहेत. रॉबिनहूडची पत्नी बिहारच्या सीतामढीत जिल्हा परिषद सदस्य आहे.