कापसाला १२ हजार हमिभाव देऊन शासनाने खरेदी करावा व अतिरिक्त विजबील दरवाढ रद्द करावी
कापसाला १२ हजार हमिभाव देऊन शासनाने खरेदी करावा व अतिरिक्त विजबील दरवाढ रद्द करावी.
वंचित बहुजन आघाडीच्या गेवराई तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा राज्यव्यापी निदर्शने मोर्चात सहभाग.
वंचित बहुजन आघाडीच्या निदर्शने अंदोलनाला डीपीआयच्या वतीने कार्याध्यक्ष अमोल सुतार, विधी सल्लागार एड. सोमेश्वर कारके आणि प्रहार पक्षाच्या वतिने तालुका अध्यक्ष अर्जुन सुतार यांनी पाठींबा दिला होता.
गेवराई : ( आशोक कुंभार )कापसाला प्रती क्विंटल ६ हजार रुपये हमीभाव असल्याने खाजगी व्यापारी ७ ते ८ हजार रुपये प्रती क्विंटल दराने कापूस खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस पिकाला केलेला खर्च निघणे मुश्कील झाले असून शेतकरी अर्थीक अडचणीत सापडला आहे. मुला-मुलीचे शिक्षण, लग्ण व दैनंदिन खर्च भागत नसून याच काळात घरगुती विजबिलात अतिरिक्त केलेली वाढ या शासनाच्या जुलमी निर्णयामुळे शेतकरी अत्महत्या वाढत आहेत.
महाराष्ट्र शासनाने कापसाला प्रति क्विंटल १२ हजार हमीभाव देऊन शासनाने खरेदी करावा तसेच वाढलेली अतिरिक्त विजबील तात्काळ रद्द करावी यासाठी दि. २४ शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडीने तिर्व निदर्शने करत राज्यव्यापी आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यभर तर मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या सूचनेनुसार मराठवाड्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात व तहसील कार्यालयावर निदर्शने अंदोलन करण्यात आले. या शेतकरी हिताच्या राज्यव्यापी भव्य निदर्शने अंदोलनात गेवराई तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करुन तात्काळ मागण्या मान्य केल्या नाहीत तर तिव्र अंदोलन करण्यात येईल असे तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला मागण्यांसंदर्भात निवेदन दिले शेतकऱ्यांच्या कापसाला प्रती क्विंटल १२ हजार रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे,
घरगुती विजबिलात केलेली अतिरिक्त वाढ रद्द केलीच पाहिजे, शेतकरी विरोधी राज्य सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी तहसिल परिसर दणाणून गेला होता.
यावेळी भिमराव चव्हाण,दस्तगीर शेख, किशोर भोले,अनिल पंडीत,ज्ञानेश्वर हवाले, किशोर चव्हाण, बाबुराव गायकवाड, सुनिल धोत्रे,कृष्णा खेडकर, बाळासाहेब मुळुक,बाबासाहेब शरणांगत, राजु गायकवाड, अजय खरात, दिलिप वाघ, नवनाथ प्रधान,शिवाजी केदार, मच्छींद्र प्रधान, सुबोध कांडेकर, अनंद गिरे, लखण मगर, सिद्धार्थ प्रधान, अक्षय जोगदंडसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
जून २०२२ च्या काळात अनेक वृत्तपत्रातुन यंदा कापसाला १५ हजार रुपये येवढा विक्रमी दर भेटेल अशा अशयाच्या बातम्या सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या होत्या या बातम्यांवर विश्वास ठेवुन शेतकऱ्यांनी कापूस या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली, मशागत केली रासायनिक खते व फवारणी केल्या याच कालावधीत कापूस पिक वाढीस व पाते लागली असता पाऊसाने उघडीप दिल्याने वाढ खुंटली व पाते झड झाली, शेतकऱ्यांनी पुन्हा महागडे खते व औषधांची फवारणी करून मशागत केली, शेवटच्या टप्यात दोड्या पाते लागलेली असतांना पाऊसाची संततधार सलग विस दिवस सुरू राहिल्याने दोड्या काळ्या पडून सडून गेल्याने कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. या सर्व आडचणींना तोंड देत पुन्हा फवारणी करून खताचे डोस देऊन मशागत करून कपाशी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला, या अस्मानी संकटावर काही शेतकऱ्यांनी मात केली, आता कापसाला १२ ते १५ हजार रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी राजाला होती, मात्र सुरुवातीला विजयादशमीच्या मुहुर्तावर ११ ते १५ हजार रुपये प्रती क्विंटल दराने कापसाची खरेदी केली तद्नंतर कापसाला केवळ ७ ते ८ हजार रुपये प्रती क्विंटल दराने भाव दिला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघणे मुश्कील झाले आहे.
७० ते ८० टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापसाच्या थप्या आहेत मात्र कापसाला केवळ ७ ते ८ हजार रुपये प्रती क्विंटल किरकोळ दर मिळत असल्याने कापूस पिकाला केलेला खर्च निघणे मुश्कील झाले असून सहा महिने राबराब राबूनही पदरात काहीच पडत नाही.