SBI ग्राहकांसाठी खुशखबर! RD वरही मिळणार आता दमदार रिटर्न, लगेच चेक करा
तुमच्याकडे पैसे जमा होतील असं जाणकार सांगतात. आता SBI मध्ये जर तुम्ही RD सुरू केली तर तुम्हाला त्याचा डबल फायदा होणार आहे. SBI ने 25 बेसिस पॉईंट्सने वाढ केली आहे. तुम्ही जर RD करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या फायद्याची बातमी आहे.
हे नवे दर 15 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. तुम्ही RD अगदी 100 रुपयांपासून सुरू करू शकता. 12, 9 आणि 6 महिन्यांसाठी सुद्धा RD काढता येते. ज्येष्ठ नागरिकांना यावर अधिक व्याज मिळतं.
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सामान्य ग्राहकांना आरडी स्कीमवर ६.५ टक्के ते ७ टक्के व्याजदर देत आहे. दुसरीकडे, जर आपण ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोललो, तर त्यांना बँकेकडून 50 बेसिस पॉइंट अधिक व्याजदर दिला जात आहे.
1 ते 2 वर्षांसाठीच्या RD वर 6.80 टक्के व्याजदर तर 2-3 वर्षांसाठीच्या RD साठी 7 टक्के व्याजदर SBI ग्राहकांना देत आहे.
3 ते 5 वर्षांसाठीच्या RD वर 6.5 टक्के व्याजदर दिलं जात आहे. तर 5 ते 10 वर्षांच्या RD वर 6.5 टक्के व्याजदर दिलं जात आहे.
बँकेने 2 कोटी रुपयांवरील एफडीवरील व्याजदरात 25 ते 75 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग अनेक वेळा व्याजदरात वाढ केली आहे. गेल्या वर्षी मे पासून आतापर्यंत मध्यवर्ती बँकेने एकूण ६ वेळा व्याजदरात वाढ केली आहे.