ताज्या बातम्या

पिंपरी : रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या कमी उंचीमुळे अपघाताला निमंत्रण


 



 

पिंपरी : शहरातील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची उंची ही लोकलच्या डब्यांच्या मानाने कमी असल्याचे निर्दशनास आले आहे. परिणामी या डब्यांमध्ये चढ-उतार करताना प्रवाशांना अपघातास सामोरे जावे लागत आआहेप्लॅटफॉर्मची उंची हा लोकलच्या डब्याच्या उंचीशी समांतर असावी या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

 

पुणे ते लोणावळा स्थानकादरम्यान खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, बेगडेवाडी, घोरवाडी, तळेगाव या स्थानकांचे प्लॅटफॉर्म हे खाली आहेत. त्यामुळे लोकलमध्ये चढणार्‍या आणि उतरणार्‍या प्रवाशांना सहजपणे चढता व उतरता येत नाही. अंतर जास्त असल्याने पायाला ईजा होण्याच्या भीतीने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलावर्ग सावकाश उतरण्याचा प्रयत्न करतात. मात्र लोकलचा स्थानकावरील थांबा केवळ तीस सेकंदाचा असतो

 

यामध्ये गाडीत चढणार्‍या आणि उतरणार्‍या प्रवाशांची बर्‍याचदा गर्दी होऊन कोलाहल माजतो. अशातच गाडी सुरू झाल्यावर चढणार्‍या आणि उतरणार्‍या प्रवाशांच्या गडबडीत तोल जाऊन एखादा प्रवासी प्लॅटफॉर्म आणि लोकल यामधील अधिक अंतरामुळे रेल्वेखाली जाऊन पडतो. गर्दीच्या ठिकाणांवरील स्थानकांमध्ये अशी मृत्युसोबतची कसरत नेहमीचीच सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनासह प्रवाशांनीदेखील केल्या आहेत. शिवाजीनगर, आकुर्डी, चिंचवड, लोणावळा या स्थानकांमध्ये तर नेहमीच अशा घटना घडत आहे

 

कामावर जाताना आणि येताना अपघाताच्या घ

 

कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी आणि त्यानंतर घरी वेळेत जाण्यासाठी प्रवाशांची लोकल ठरलेली असते. मात्र त्यानंतरच्या लोकलमध्ये तासाभराचे अंतर असते. त्यामुळे लोकल चुकू नये म्हणून प्रवाशी खटाटोप करतात. परिणामी गर्दी होऊन अपघाताच्या घटना घडता

 

लहान मुले, दिव्यांग, गरोदर महिला, ज्येष्ठांना त्रा

 

ज्येष्ठ नागरिक, गरोदर किंवा ज्या महिलांसोबत लहान मुले असतात, अशा महिलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. बर्‍याचदा घरातील एखादा व्यक्ती गाडीत चढतो, तर बाकीचे खाली राहतात; अशा वेळी एखादा व्यक्ती चढताना खाली पडतो आणि अपघाताच्या घटना घडता

 

स्वस्त आणि जलद प्रवासासाठी लोकलची नि

 

लोकल हे सर्वात स्वस्त व जलद प्रवासाचे साधन असल्यामुळे लोणावळ्यापासून इतर ठिकाणाहून पुण्याला जवळपास नव्वद टक्के लोक हे लोकलवर अवलंबून आहेत. ही सेवा बस वा इतर खासगी वाहतुकीपेक्षा स्वस्त तर आहेच, त्याहूनही ती जलद असल्याने नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचतो. इतर वाहतुकीसारखी दरवर्षी लोकलच्या तिकिटाची दरवाढ होत ना

 

शहरातील मेट्रोचे प्लॅटफॉर्म समां

 

शहरातील मेट्रोचे प्लॅटफॉर्म हे मेट्रोला समांतर करण्यात आले आहेत. यामध्ये अंतर नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी आहे. अशा पध्दतीचे प्लॅटफॉर्म लोकलचेदेखील होणे अपेक्षित आहेत. परिणामी होणारे अपघात टाळता येती

 

मुंबईच्या जुन्या लोकल दाखल; अशी ओ

 

मुंबईमध्ये सुरू असलेल्या लोकल जुन्या झाल्या की, त्या पुण्यामध्ये वापरण्यात येत आहेत. त्या लोकलची बांधणी मुंबई शहरातील प्लॅटफॉर्मनुसार करण्यात आली आहे. त्याकारणाने पुण्यातील प्लॅटफॉर्म हे कमी उंचीचे ठरत आहेत; म्हणून अपघात वाढत आहेत, अशी ओरड प्रवाशी संघाकडून होत आहे

 

लोकलच्या बर्‍याच स्थानकामधील प्लॅटफॉर्म हे कमी उंचीचे आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या दिव्यांगांनाही कामाच्या ठिकाणी जाताना याचा त्रास होतो. लोकल बाहेर पाय टाकताना पाय मुरगळण्याची भीती वाटते. याबाबत प्रशासनाने धोरण राबविणे महत्त्वाचे आ

 

– दिव्यांग रेल्वे कर्मचा

 

पिंपरी : सर्व्हिस रस्त्यांसाठी 60 टक्के जागा ताब्या

 

पुणे मेट्रोचा ‘गोंधळ’! डिस्प्लेवर एकाच वेळी दोन टायमिंगतरीहे..रडल.तरही.वडत.सत.टनात..


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button