बाबा वेंगांची भारताबाबत भविष्यवाणी, 2023 मध्ये होणार मोठा विनाश!
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
त्याचबरोबर तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपासारखाच भूकंप आशियामध्येही दिसू शकतो, असे सांगण्यात येत असून भारताबाबतही एक महत्त्वाची भविष्यवाणी समोर आली आहे.
दरम्यान, हे भाकीत बाबा वेंगा यांनी केले होते. बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे बहुतेक अंदाज खरे ठरले आहेत. याच क्रमाने 2023 बाबत त्यांनी भारतासाठी (India) एक महत्त्वाची भविष्यवाणीही केली होती. 1996 मध्ये बाबा वेंगाचे निधन होऊनही, बाबा वेंगा यांचे भाकीत अजूनही खरे ठरत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
बाबा वेंगा
दुसरीकडे, तुर्कस्तान आणि सीरियातील (Syria) भूकंपाच्या काही दिवसांपूर्वी नेदरलँडचे संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी तुर्कस्तान आणि सीरियाच्या आसपासच्या भागात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती आणि त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्याचवेळी नैसर्गिक आपत्तींचाही अंदाज बाबा वेंगा यांनी वर्तवला होता. बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये अनेक भयानक नैसर्गिक आपत्तींचे भाकीत केले आहे.
फ्रँक HuggerBeats
यासोबतच आता फ्रँक हगरबीट्सने भारताबाबत एक भविष्यवाणी केली आहे. फ्रँक हूगरबीट्स म्हणतात की, भारत-अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप होऊ शकतो. त्याचवेळी, बाबा वेंगा यांनी भारतासह अनेक आशियाई देशांसाठीही अशीच काही भविष्यवाणी केली आहे.
अणुस्फोट होणार
बाबा वेंगा यांनी आधीच भाकीत वर्तवले होते की, आशियातील कोणत्यातरी देशात अणुस्फोट होईल, त्यामुळे भारताचे मोठे नुकसान होईल. पृथ्वीवर एक मोठी भूवैज्ञानिक घटना घडेल, ज्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत बदल होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल. पृ
थ्वीच्या कक्षेत बदल झाल्यास पृथ्वीवर भयानक भूकंप होतील. अशा परिस्थितीत त्या भूकंपाच्या तडाख्यात कोणता देश येतो, हा चिंतेचा विषय ठरणार आहे. यासोबतच बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये सौर त्सुनामीचीही भविष्यवाणी केली आहे.