एअर इंडियाची विक्रमी झेप; ८४० विमाने खरेदी..
टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया कंपनी अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रान्सच्या एअरबस कंपनीकडून एकूण ८४० विमाने खरेदी करणार आहे.
यासंबंधीचा करार करण्यात आला आहे. सुरुवातीला ४७० विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा आणखी ३७० विमाने घेणार असल्याचे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी निपुण अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.
हवाई क्षेत्रातील मोठा करार
एअर इंडियाचे वरिष्ठ वाणिजिक्य आणि रुपांतरण विभागाचे अधिकारी निपुण अग्रवाल यांनी बुधवारी लिंक्डिनवर लिहिलेल्या एका पोस्टमधून याचा खुलासा झाला आहे. तसेच एअर इंडियाच्या करारानंतर भारत आणि जगभरात या कराराचे कौतुक केले गेले, लोकांचे हे प्रेम आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असेही अग्रवाल म्हणाले
एअर इंडियाने मंगळवारी फ्रान्सच्या एअरबसकडून २५०, तर अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून २२० विमाने घेणार आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातलला सर्वात मोठा आणि ऐतिहासिक असा हा करार आहे. आता निपुण अग्रवाल यांनी सूचित केल्याप्रमाणे हा करार आणखी मोठा होणार आहे. कारण या ४७० विमानांच्या खरेदीमध्ये आणखी ३७० विमानांची भर पडणार आहे. त्यामुळे एकूण खरेदी करण्यात येणाऱ्या विमानांची संख्या ८४० होणार आहे. जुन्या करारानुसार जे ४७० विमाने घेतली जाणार होती, त्यामध्ये पुढच्या दशकापर्यंत ३७० विमानांची वाढ करण्यात येणार आहे.