ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे
भारताचा दोन्ही देशांना मजबूत असा मदतीचा हात सातवे विमान भूकंपग्रस्त देशांकडे रवाना
दोन वर्षांअगोदर आलेल्या कोरोना विषाणू महामारी काळात भारताने संपूर्ण जगाला मदतीचा हात दिला आणि लाखो प्रमाणात जीवितहानी टाळण्यात यश प्राप्त केले. आताही (Earthquake) भूकंपाच्या भयावह अशा स्थितीत भारताने दोन्ही देशांना मजबूत असा मदतीचा हात पुरविला आहे. उत्तरप्रदेशातील हिंडन विमानतळावरून काल शनिवारी सायंकाळी सातवे विमान भूकंपग्रस्त देशांकडे रवाना करण्यात आले.
6 फेब्रुवारी रोजी आलेल्या 7.8 तीव्रतेच्या (Earthquake) भूकंपात आज रविवारी मृतांची संख्या 31 हजारांवर पोहोचली आहे. संयुक्त राष्ट्राच्या मदतकार्य विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.