कानळद येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष कार्यक्रम साजरा
कानळद येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष कार्यक्रम साजरा
निफाड : प्रतिनिधी कृष्णा जाधव कानळद येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी अधिकारी साठे साहेब यांनी केली.
तृणधान्य व त्यांचे आहारातील महत्त्व व गरज या विषयावर डॉक्टर सचिन शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थी उपस्थित होते तसेच बचत गटाच्या महिला, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .सदर कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सदर स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक स्नेहल राहुल जाधव हिने पटकावला तर द्वितीय क्रमांक आराध्या बाळासाहेब जाधव व तृतीय क्रमांक अथर्व किरण जाधव* याला देण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा कानळद येथील विद्यार्थ्यांनी सुंदर असे निबंध सादर केले तसेच रांगोळी काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी साठे साहेब ,ग्रामसेवक त्रिभुवन साहेब शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संपतराव जाधव,सरपंच शांताराम जाधव, माजी सरपंच गणेश जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष किरण जाधव ,रोहिदास जाधव, जालिंदर जाधव, पंडित जाधव, प्रमोद जाधव, आप्पासाहेब जाधव,
पत्रकार कृष्णराव जाधव ,गोविंद पारखे, दत्तात्रय वाघ, शिवाजी जाधव, बापू जाधव, राजाभाऊ जाधव, मच्छिंद्र जाधव, दत्तू आबा पारखे,
सुनील जाधव, अंबादास अष्टेकर, ऋषिकेश पारखे, सुदर्शन जाधव ज्ञानेश्वर पारखे, राहुल जाधव , अप्पासाहेब पारखे, शरद जाधव, अरूण चव्हाण,
श्रीहरी जाधव ,आशाताई, अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.