बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौसाळा शाखेतील गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी ठीय्या आंदोलन
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौसाळा शाखेतील गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी ठीय्या आंदोलन
___
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या चौसाळा शाखेतील मयत शेतक-यांच्या खात्यावरील रक्कम बँकेतील आधिकारी-कर्मचारी संगनमतानेच परस्पर गायब करत असून खातेधारकांना बॅक स्टेटमेंट मागितल्यावर पोलिसात तक्रार करून धमकावले जात असून या दडपशाहीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.८ फेब्रुवारी बुधवार रोजी चौसाळा शाखेसमोर ठीय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विजय झोडगे, डिगांबर झोडगे, भास्कर झोडगे, बाबासाहेब झोडगे, नवनाथ चोथवे, संतोष साबळे, अशोक कुडके, संभाजी झोडगे, सखुबाई झोडगे, शांताबाई झोडगे, जयश्री झोडगे, चंद्रकला झोडगे, सुलाबाई झोडगे,आशाबाई झोडगे दत्तु झोडगे, रेवण झोडगे, चक्रधर झोडगे,संदिपान झोडगे, अशोक चोथवे आदि सहभागी होते.मुख्य कार्यकारी आधिकारी दि.बीड जिल्हा मध्यवर्ती बँक लि.बीड शरद ठोंबरे, व्यवस्थापक मुख्यालय डीसीसी बॅक बीड रवी उबाळे,उपनिरीक्षक पानपाटील नेकनुर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.
चौसाळा शाखेतील कर्मचारी व दलाल संगनमतानेच शेतक-यांची आर्थिक फसवणूक ;आमिष आणि दबाव
___
चौसाळा शाखेतील आधिकारी-कर्मचारी व दलालांमार्फत संगनमतानेच अडाणी शेतक-यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर उचलण्यात येत असून संबधित प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात असून प्रकरण मिटवण्यासाठी आमिष दाखवली जात आहेत त्याचबरोबर गावपुढारी, राजकीय नेते यांच्याकडुन दबाव आणला जात असून तक्रारदार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी देत दडपण आणण्याचा प्रयत्न होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅकेची एटीएम सेवा बंद असुन तात्काळ सुरू करा :-डाॅ.गणेश ढवळे
___
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेने सुरू केलेली एटीएम सेवा बंद असुन एटीएम वरून व्यावहार होऊ शकत नसल्यामुळेच शेतक-यांचे सारे व्यवहार ठप्प पडले आहेत. बॅकेने एटीएम द्वारे व्यवहार बंद केल्याचे खाजगीत बॅक आधिकारी सांगत असतानाच अधिकृतरित्या मात्र तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत लवकरच बिघाड दुरुस्त होऊन व्यवहार सुरळीत सुरू होतील असे सांगितले जात असून तात्काळ एटीएम सेवा सुरळीत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.