सुनेवर वाईट नजर, मुलाने केली वडिलांची हत्या

मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची भयंकर घटना राजस्थानच्या उदयपूर येथे घडली आहे. हत्येनंतर त्याने वडिलांना पुरून त्यावर समाधी बनवली. हत्येनंतर काही दिवसांनी मयताच्या मुलीने तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला आहे.
ही घटना उदयपूरच्या परसाद येथे घडली. येथील पोलिसांना काही दिवसांपूर्वी नवलराम मीणा नावाच्या व्यक्तिच्या मृत्युची बातमी मिळाली होती. त्यांच्या मृत्युनंतर त्यांना दफन करून त्यावर समाधी बांधण्यात आली होती. नवलराम यांच्या मृत्युच्या 20 दिवसांनंतर त्यांची मुलगी प्रमिला यांनी आपला भाऊ रामलाल याच्यावर पित्याचा खून केल्याचा आरोप केला.
त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून ही समाधी पुन्हा उकरली आणि मृतदेह बाहेर काढून त्याचं विच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर रामलाल याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता रामलालने आपल्या वडिलांची हत्या केल्याचं कबूल केलं.
रामलालच्या म्हणण्यानुसार, नवलरामची रामलालच्या बायकोवर वाईट नजर होती. त्यांनी तिच्याशी शिवीगाळ करून छेडही काढली होती. त्यामुळे रामलाल याने नवलराम यांना मारहाण केली आणि खाटेच्या कडेवर आपटून त्यांची हत्या केली. ही घटना 10 जानेवारी रोजी घडली होती. पण, आपल्या वडिलांचं नैसर्गिक निधन झाल्याचं सांगून सामाजिक आणि धार्मिक रीत म्हणून त्यांचा मृतदेह दफन करून त्याच्यावर समाधी बांधण्यात आली. पण, त्याच्या बहिणीला संशय आला आणि रामलालचं भांडं फुटलं.