ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज !


महाराष्ट्र: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे डख यांनी सांगितल्याप्रमाणे 25 एप्रिल 2023 म्हणजेच आजपासून ते 2 मे 2023 पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी भागात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे जर हा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला तर शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.



या पावसाचा फायदा मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो असं मत व्यक्त होत आहे. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांदा काढणी करत आहेत तर काही जिल्ह्यात हळद काढणी सुरू आहे. अशा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, आता आपण पंजाबराव डख यांनी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सावधान ! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

कोणत्या जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस?

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल पासून म्हणजेच आजपासून ते दोन मे पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. डखं सांगतात की, आजपासून दोन मे पर्यंत बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, अहमदनगर आणि नासिक या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.

तसेच काही जिल्ह्यात गारपीट देखील होईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मोठा पाऊस पडेल यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढत आहे. विशेषता ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे भर पडणार आहे. एकंदरीत डख यांचा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button