महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक सुरवसे
महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक सुरवसे यांची निवड.
बीड : मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे विचार तळागळातील गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रामाणिकपणे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अशोक सुरवसे यांची नियुक्ती मुंबई राजगड कार्यालय येथे,महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केली आहे.यावेळी शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे,राज्य उपाध्यक्ष अशोकभाऊ तावरे, वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष रवी नेमाने,यांच्या उपस्थित पत्र दिले.
अशोक सुरवसे हे मनसेच्या स्थापनेपासूचे सक्रिय कार्यकर्ते असून मनसेच्या सर्व आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे, महाराष्ट्र सैनिक ते मनसे उपशहराध्यक्ष ,बीड शहराध्यक्ष,बीड जिल्हा सचिव,अशा महत्त्वाच्या पदावरील जबाबदाऱ्या सुरवसे यांनी मनसेत पार पाडल्या असून मनसेने बीड जिल्हा सहकार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची नवीन संधी त्यांना दिली आहे.अशोक सुरवसे यांच्या नियुक्तीचे,जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, उपजिल्हाध्यक्ष सदाशिव बिडवे,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रामेश्वर साळुंखे,बीड तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके शिरूर तालुकाध्यक्ष सोपान मोरे, बीड शहराध्यक्ष करण लोंढे शहर उपाध्यक्ष आकाश टाकळकर शहर सचिव तुषार दोडके व महाराष्ट्र सैनिक अनिल जमदाडे बालाजी काटे कार्तिकी जव्हेरी यांनी स्वागत केले आहे.