बीडच्या पात्रुड शिवारात होताहेत जादूटोणाचे प्रयोग; गावकऱ्यांनी दिला चोप
राज्यात जादूटोणा (Black Magic)आणि अंधश्रद्धा कायदा लागू असताना देखील अनेक भागात अजूनही असे प्रकार घडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात देखील असाच काही संतापजनक प्रकार समोर आला आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात देखील असाच काही संतापजनक प्रकार समोर आला आहे. माजलगाव शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या पात्रुड शिवारातील एका ओढ्याजवळ मागील अनेक दिवसांपासून रात्रीच्यावेळी जादूटोणा, करनी, भानामती यासारखे प्रकार सुरू आहेत. सकाळी लिंबू, कनकेचे दिवे, फुलं, नारळ यांसारख्या वस्तू पाहायला मिळत असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर शेतात जाणाऱ्या महिला, नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, गावकऱ्यांनी जादूटोणा करणाऱ्या पकडत चोप देत गावातून हाकलून लावले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या पात्रुड शिवारात जादूटोणाचे प्रयोग केले जात आहे. मागील महिनाभरापासून हा प्रकार घडत असल्याने परिसरात सकाळी लिंबू, नारळ, फुलं, पीठाचे दिवे यासारखे साहित्य शेतात जाणाऱ्या महिला, नागरिकांना आढळून येत आहे.
शेतात जाणाऱ्या महिला, लहान मुलं भयभीत झाले आहेत. अनेक महिलांनी शेतात जाणं बंद केल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. त्यामुळे गावात आणि परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, हे सर्व प्रकार सुरू असतानाच, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बाहेरगावाहून एक चारचाकी वाहन परिसरात आले होते. या वाहनातून महिला आणि काही पुरुष जादूटोणा होत असलेल्या ठिकाणी आले होते. यावेळी पात्रुड गावातील काही महिला, नागरिक तिथे गेले. रात्रीच्या अंधारात जाळ करून तिथे लिंबू, नारळ, फुलं, कणकेचे दिवे यांसारखे भानामतीला लागणारं साहित्य ठेवून मंत्रतंत्र पठन केले जात होते. याची माहिती गावातील काही नागरिकांना मिळाली. त्यामुळे गावातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मांत्रिकाकडून जादूटोणा करण्यात येत असल्याचे पाहून नागरिकांनी त्यांना रोखत जाब विचारला.
गेल्या काही दिवसांपासून पात्रुड शिवारात जादूटोणाचे प्रयोग होत असल्याने आणि परिसरात लिंबू, नारळ, फुलं, कणकेचे दिवे यांसारखे साहित्य आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महिलासह गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र हे सर्व प्रकार कोण करत आहे, याबाबत माहिती नसल्याने त्याचा शोध घेतला जात होते. मात्र याचवेळी बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास परिसरात बाहेरगावाहून एक चारचाकी वाहन परिसरात आले असून, या वाहनातून महिला आणि काही पुरुष जादूटोणा होत असलेल्या ठिकाणी असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यामुळे शेकडो गावकरी तिथे पोहचले आणि जाब विचारला. तसेच बाहेरून आलेल्या मांत्रिकासह त्याच्या सहकाऱ्यांना चोप दिला