महिला बॉसने शरीरसुखाची केली मागणी ऐकले नाही म्हणून नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं
कंपनीने आयोजित केलेल्या डिनर पार्टीदरम्यान एका महिला बॉसने शरीरसुखाची मागणी केली होती. बॉसचे ऐकले नाही म्हणून मला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं, असा आरोप गुगुलमधील एका माजी कर्मचाऱ्याने केला आहे.
सध्या कर्मचारी कपातीमुळे google चर्चेत असतानाच कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, एका उच्चपदस्थ महिला कर्मचाऱ्याने या पुरुष कर्मचाऱ्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्याने आपल्याला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. संबंधित घटना डिसेंबर 2019 मध्ये मॅनहॅटन येथील रेस्तराँरंटमधील पार्टीदरम्यान घडली आहे. माजी कर्मचाऱ्याने ‘लैंगिक छळ, लैंगिक भेदभाव, वंशवाद आणि द्वेषपूर्ण वागणूक’ या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागल्या आहेत. ज्या कार्मचाऱ्याने हे आरोप केलेत तो गुगलमधील अन्न पदार्थ, शितपेय आणि रेस्तराँरंट डिव्हीजनमध्ये सीनियर एक्झीक्युटीव्ह पदावर कामाला होता. ज्या महिलेवर हे आरोप करण्यात आले आहेत ती सुद्धा कंपनीवर वरिष्ठ पदावर होती. ती गुगल कंझ्युमर गव्हर्मेंट आणि एन्टर्टेनमेंट विभागामध्ये प्रोग्रामॅटिक मीडियाशी संबंधित उच्चपदस्थ अधिकारी होती.
गुगलच्या या माजी कर्मचाऱ्याने या महिलेने दिलेली वागणूक फारच वाईट होती. तिच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे आपल्याला फार त्रास होत होता. यासंदर्भात या व्यक्तीने ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटकडे अधिकृतपणे तक्रार केल्यानंतरही या महिलेविरोधात कारवाई करण्यात आली नाही, असेही म्हटले आहे. आपल्याला मागील वर्षी ऑगस्टमध्ये गुगलच्या नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. नोकरीवरुन काढून टाकताना, ‘तो इनक्युजिव नव्हता,’ म्हणजेच सर्वांशी मिळून मिसळून राहणारा नव्हता असे सांगण्यात आले होते.
दरम्यान, संबंधित महिलेने आपल्या माजी सहकाऱ्याकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियामध्ये म्हटले आहे की, ही याचिका खोट्या माहितीच्या आधारे दाखल करण्यात आली आहे. कंपनीवर नाराज असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याने ही याचिका दाखल केली आहे.
गुगलची मातृक कंपनी असलेल्या अल्फाबेटने जगभरामधील जवळजवळ 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. ही संख्या कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या ही सहा टक्के आहे. कंपनीच्या 25 वर्षांच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाईंनी कंपनी या निर्णयाची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे, असे सांगितले. कंपनी कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना मदत करेल, असेही पिचाई म्हणाले.