मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला जन्मठेप
जिल्हा बाल कल्याण अधिकारी यांना एक अल्पवयीन मुलगी ही बागातली देवी परिसरात भीक मागताना दिसून आली होती.
या मुलीला त्यांनी बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार गायत्री बालिकाश्रमात दाखल केले होते. त्यानंतर पीडितेच्या आईने तिचा ताबा घेतला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2019 रोजी पीडितेला वेदना होत असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयात (Hospital) दाखल केले होते. तेथे तिने वडीलांनी तिच्यावर अत्याचार करून धमकावल्याचे कथन केले होते.
त्यानंतर जुने शहर पोलिसांनी (Police) आरोपी सावत्र बापाविरूद्ध भादंवि कलम 376 अ, 376 ब,एन, एफ 506 तसेच पोक्सो कायद्याचे कलम 4,5,6 नुसार गुन्हा दाखल केला होता. पीएसआय वर्षा राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्यामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध होण्याकरीता 8 साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली.