स्वीडनच्या मुलीची वरात थेट भारताच्या गावात! फेसबूकवरून जुळले प्रेम…
प्रेमात पडलेले लोक प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार होत असतात. अनेकदा प्रेमी कोणत्याही टोकाला जातात. त्याचे प्रत्यय आजूबाजूच्या घटनांवर नियमित येत असतात.
आताही असेच एक उदाहरण समोर आले आहे. यामध्ये स्वीडनमधील तरूणीने चक्क हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येऊन उत्तर प्रदेशातील मुलाशी लग्न केले आहे.
क्रिस्टन लीबर्ट (Christen Liebert) असे या मुलीचे नाव आहे. ती मूळची स्वीडनची आहे. उत्तर प्रदेशातील पवन कुमार याच्याशी तिची फेसबुकवरून 2012 मध्ये ओळख झाली होती. पवनकुमार हा उत्तर प्रदेशातील एटा या गावचा आहे.
त्याने बी.टेक.चे शिक्षण घेतले असून तो देहराडूनमध्ये एका खासगी फर्ममध्ये कार्यरत आहे. क्रिस्टन लीबर्ट शुक्रवारी (२७ जानेवारी) एटा येथे आली. येथील शाळेत दोघांचे हिंदू प्रथापरंपरांनुसार लग्न पार पडले.
या दोघांच्या विवाह सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये भारतीय विवाह परंपरेनुसार वेशभूषा केलेले क्रिस्टन लिबर्ट आणि पवनकुमार एकमेकांना पुष्पहार घालताना दिसतात. या दोघांची 2012 मध्ये फेसबुकवर ओळख झाली होती.
त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. जवळपास 11 वर्षे ते एकमेकांना डेट करत आहेत.
पवन कुमारच्या कुटुंबीयांचा या लग्नाला कोणताही आक्षेप नाही. त्याचे वडील गीतम सिंह म्हणाले की, मुलांच्या आनंदातच आमचा आनंद आहे. आमचा या लग्नाला पाठिंबा आहे.
क्रिस्टन लिबर्ट म्हणाली की, मी यापूर्वीही भारतात आली होते. मला भारत खूप आवडतो. या लग्नामुळे मी खूप खूश आहे.