स्पर्धेच्या युगात सर्वांगीण प्रगतीसाठी संगणक ज्ञान अत्यावश्यक – डॉ.अजयदादा धोंडे
स्पर्धेच्या युगात सर्वांगीण प्रगतीसाठी संगणक ज्ञान अत्यावश्यक – डॉ.अजयदादा धोंडे
प्राचार्य डॉ. डी बी राऊत यांनी केला शाळेचा कायापालट नागनाथ विद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन संपन्न
आष्टी : ‘आष्टी दुर्गम भाग असूनसुद्धा नागतळा शाळेची तुलना ही आष्टी व कड्याच्या शाळेबरोबर होत आहे. नागनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात
जे आठ संगणक बसवले आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा व संगणकाचे जागतिक ज्ञान अर्जित करावे व स्वतःची प्रगती साधावी कोणत्याही ठिकाणी नोकरीत गेले तर स्पर्धा परीक्षा आहेतच व त्या सहज पार करावाच्या असतील तर संगणक ज्ञान आवश्यक आहे.स्पर्धेच्या युगात संगणक ज्ञानाशिवाय प्रगती नाही!’ असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.अजयदादा धोंडे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील नागतळा येथील नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश गडाचे महंत ह भ प काशिनाथ महाराज होते. यावेळी मंचावर रामदास सोनवणे फौजी, प्राचार्य डॉक्टर डी बी राऊत, सरपंच बाबासाहेब गर्जे आदी सह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले सरस्वतीच्या प्रतिमांचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. हभप.काशीनाथ महाराजांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.जर अभ्यास केला नाही तर आपल्या भागात कुठल्याच सुविधा नाहीत भाग सुपीक नाही. आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही जास्तीत जास्त आपण ट्रक ड्रायव्हर ऊसतोड मजुरी पर्यंत पोहोचू शकतो त्यासाठी प्रत्येकाने अभ्यास हा केलाच पाहिजे अभ्यासाशिवाय पर्याय नाही जर उच्चशिक्षित व्हायचे असेल तर अथक प्रयत्न व संगणक ज्ञान असे सातत्य ठेवल्याशिवाय आई-वडिलांचे शाळेचे गावाचे व महाराष्ट्राचे नावलौकिक होणार नाही जो कोणी असे प्रयत्न करीन त्यांना माझे आशीर्वादच राहतील असे गणेश गडाचे महंत ह.भ.प. काशिनाथ महाराज म्हणाले की,याप्रसंगी रामदास सोनवणे फौजी म्हणाले की, प्राचार्य डाॕ.डी.बी. राऊत यांनी प्रयत्न करून संगणक कक्ष स्थापन केले आहे त्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा हातोला गावचे सरपंच बाबासाहेब गर्जे म्हणाले की, स्वतःची प्रगती करावयाची असेल तर स्वतःच प्रयत्न करावे लागतील दे रे हरी पलंगावरी असं या संगणक युगात जमत नाही नागतळा खडकवाडी गावचे सरपंच माननीय शिवाजीराजे गर्जे म्हणाले की, या शाळेला जे आवश्यक असेल ती मी स्वतः पूर्ण करीन जे प्रयत्न शाळा करीत आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा पालकांनी वेळोवेळी आपल्या पाल्यांची शिक्षकांची भेट घेऊन प्रगतीची विचारपूस करत जावी याप्रसंगी पाटसरा गावचे सरपंच माननीय अभय जी राजे गर्जे म्हणाले की नागतळा गावची शाळा जशी राऊत सरांनी संगणक कक्षासी जोडली तसेच पाटसरा गावच्या शाळेकडेही लक्ष द्यावे याप्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक संगणक संच शाळेत भेट दिला यामध्ये विकास गोरे, विष्णू वनवे, आजिनाथ गोरे, गोपीनाथ बुधवंत, गणेश गर्जे, शहादेव गर्जे, उद्धव वनवे, ईश्वर गर्जे, सचिन गोरे गोपीनाथ गोरे, महेश कद्रे, देवदत्त कद्रे व इतरांनी शाळेला सिंगलबार डबलबार लेझीम व इतर शालेय साहित्य दिले कमी वेळेत शाळेची प्रगती केल्याबद्दल नागतळा ग्रामस्थांनी प्राचार्य डॉ डी बी राऊत सरांचे यथोचित आदराने स्वागत केले याप्रसंगी पाटसरा गावचे सरपंच अभय गर्जे नागतळाचे सरपंच शिवाजी गर्जे मच्छिंद्र वायभासे बाळू वनवे रामदास फौजी छगनराव तरटे रभाजी गर्जे सरपंच मोराळा माजी सभापती केशवराव गर्जे ,बाळू मिसाळ, बापू आव्हाड ,विकास पवार ,सरपंच कारखेल अश्रूबा गोल्हार, शेषराव फौजी, बाबा गर्जे, माजी सरपंच नागतळा सुदर्शन सोनवणे ,अभिमान गर्जे, केशव गर्जे, मोराळा भागिनाथ गर्जे, राजेंद्र सांगळे, जिल्हा परिषद शाळेचे बापूसाहेब सानप संत वामनभाऊ विद्यालयाचे सहशिक्षक बाजीराव गोरे,गहिनीनाथ भिताडे, लता सोनवणे सदस्य ,नागतळा ठोंबरे, सांगवी पाटण आजबे , किन्ही माजी मुख्याध्यापक जाधव टी एम .,ग्रामस्थ आजी माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. नागतळा हायस्कूलचे बी. वाय.शिंदे, प्रा.राम बनसोडे, त्यांचे सर्व कर्मचारी, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रा.शिवदास विधाते ,संजय शेंडे , माऊली बोडखे , तसेच परिसरातील सर्व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी बी राऊत यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुरेश औटे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता गावकऱ्यांना उपस्थितांना नाष्टा देऊन झाली. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संगणक कक्षाचे उद्घाटन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली