मोठी बातमी सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद शिकवणार
मध्य प्रदेशमधील शिवराज सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद शिकवले जाणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याची घोषणा केली आहे.
Ramayana, Mahabharata, Vedas, Upanishads will be taught to children in the state…There're some people in the country who take pleasure in criticising our culture, spirituality, religion and great men, but they don't now much harm they're causing to the country: MP CM SS Chouhan pic.twitter.com/hjdUNGwkv0
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) January 23, 2023
भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री या नात्याने मी सांगतोय की आम्ही सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद, उपनिषद शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. या ग्रंथांमध्ये मानवाला परिपूर्ण बवण्याची क्षमता आहे, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले. विशेष म्हणजे रामचरितमानसवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच त्यांनी ही घोषणा केली आहे. तसेच राज्यात यंदा विधानसभा निवडणुकाही होणार असल्याने शिवराज सिंह चौहान यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
रामयण, महाभारत, वेद, उपनिषदे, श्रीमद्भगवद्गीता आपली अमूल्य ग्रंथ आहेत. या ग्रंथांमध्ये माणसाला परिपूर्ण बनवण्याची क्षमता आहे. त्यामुले सरकारी शाळांमध्ये मुलांना या पुस्तकांचेही शिक्षण दिले जाईल, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आपल्या देशात असेही काही लोक आहेत ज्यांना आपली संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, अध्यात्म आणि धर्म यावर टीका करण्यात आनंद मिळतो. अशा लोकांना या ग्रंथांचे महत्व माहिती नाही. आपण देशाचे नुकसान करतोय हे त्यांना कळत नाही. आपल्या देशातील कानाकोपऱ्यात सुख आणि दु:खाच्या वेळीही रामाचा जप केला जातो. त्यामुळे महापुरुषांचा अपमान करणे खपवून घेतले जाणार नाही.