मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षावर गोळीबार, पुणे हादरले
पुणे : मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला.
गुंडांनी गोळ्या झाडल्या ठेवा थिगळे यांचे कुटुंबीय ही गटना स्थळी होती. गुंडांनी समीर थिगले यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबार केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, मनसे जिल्हाध्यक्षावरच गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय संपवतोच तुला म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर या गुंडांनी फारिंग केली. खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून खंडणीची मागणी करत हा गोळीबार केला.
याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरू नगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.