क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

जुळ्या मुलींच्या जन्मानंतर पित्याने वैनगंगेत उडी मारून जीव दिला


मध्य प्रदेश : बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे जुळ्या मुलींच्या जन्मानंतर एका व्यक्तीने वैनगंगेत उडी मारून जीव दिला.
सुमारे 7 तास चाललेल्या बचाव कार्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. ही घटना वारासिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यात 18 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता फोनवर बोलत असताना 35 वर्षीय वासुदेवने वैनगंगेत उडी घेतली. माहिती मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले.

होमगार्डने रात्री दोन तास शोध मोहीम राबवली मात्र मृतदेह सापडला नाही. गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा शोध सुरू केला. दुपारी बाराच्या सुमारास बचाव पथकाने तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत वासुदेव हा तीन बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता.

मेकॅनिकचे काम करून तो रोज 500 रुपये कमवत असे. यासोबतच त्याच्याकडे 14 एकर शेती होती, त्यात तो काही पिकंही घेत असत. त्याला आधीच आस्था (6) आणि अमली (4) या दोन मुली होत्या. त्यांच्या पत्नीने बुधवारी जिल्हा रुग्णालयात आणखी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तेव्हापासून तो तणावाखाली होता. याच कारणामुळे या व्यक्तीने आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या घटनेनं कुटुंबीयांवर मोठा डोंगर कोसळला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button