आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून तीळगूळ वाटून मकरसंक्रांत साजरी
मकरसंक्रांत (Makar Sankrant) म्हटलं सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण.
आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रांत साजरी करतात.
राज्यभरात आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. विशेष करून महिला वर्गाने तीळगूळ वाटत करून संक्रातीचा सण साजरा केला. मकर संक्रात हा सण महिला सौभाग्याचं लेण लेऊन साजरा करतात.
मकर संक्रातीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये मकर संक्रात कुंकवा पलीकडची या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे.
बीडच्या काकडहिरा गावात विधवा महिलांच्या सन्मानासाठी अनोख्या पद्धीतीने मकरसंक्रातीचा सण साजरा करण्यात आला. बीडच्या प्रतिभा हावळे आणि मनीषा जायभाये या दोघी मैत्रिणी गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या गावात संक्रातीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करतात. आजच्या कार्यक्रमात शंभरहून अधिक विधवा महिलांना साडीचोळीचं वाटप करण्यात आलं.
दौंड तालुक्यातील केडगाव येथे ऊसतोड महिलांना साड्या वाटप
मकर संक्रातीचे औचित्य साधून दौंड तालुक्यातील केडगाव परिसरातील ऊसतोड महिला कामगारांना साड्या वाटप करण्यात आल्या आहेत. मागील तीन ते चार दिवसांपूर्वी व्हाट्सअप ग्रुपच्या मार्फत मदतीचे आव्हान केल्यानंतर श्री स्वामी समर्थ मठ बावीस फाटा आणि केडगाव हेल्प सेंटर या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून भरघोस मदत गोळा झाली. त्यानंतर शेताच्या बांधावर जाऊन ऊसतोड महिला कामगारांना जवळपास 200 साड्या वाटप करण्यात आल्यात.
मकरसंक्रांतचा मुहूर्त साधत नाशिकच्या रामकुंडावर अगदी सकाळपासूनच गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी महिला आणि पुरुषांची अक्षरशः झुंबड उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. रामकुंड, गांधी तलाव तसेच दुतोंड्या मारुती परिसरातही भाविकांनी डुबकी घेतली. परराज्यातूनही लाखो भाविकांनी रामकुंडावर हजेरी लावली. आज सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होत असतो. आजच्या तिथीपासून सूर्य दक्षिणायनपासून उत्तरायण होत असतो. त्यामुळे आज सुर्यास्तापासून ते सुर्योदयापर्यंत गोदावरी नदीत स्नान करणे शुभ मानले जाते.