ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

शास्त्रज्ञांना सापडली दुसरी पृथ्वी, या ग्रहावर वास्तव्य कुणाचं?


नासाने नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीप्रमाणे आणखी एक ग्रह शोधला आहे. हा ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे. (PC:NASA)
नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपने पहिल्यांदा सौर्यमालेबाहेरील नवीन ग्रहाचा शोध लावला आहे.
नासाने शोधलेल्या या ग्रहाला वैज्ञानिकांनी LHS 475 b असे नाव दिले आहे. (PC:NASA)

नासाने जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या साहाय्याने या ग्रहाचा शोध लावला आहे. नासाचा जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप सौरमालेबाहेरील ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातो. (PC:NASA)

ही एकमेव दुर्बीण आहे, जी सूर्यमालेच्या बाहेरील पृथ्वीच्या आकाराच्या ग्रहांचे वातावरण शोधण्यास सक्षम आहे. जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप ही दुर्बिण लाँच झाल्यापासून नासासाठी खूप प्रभावी ठरली आहे. (PC:NASA)

नासाने शोधलेल्या LHS 475 b या ग्रहाचा आकार साधरणपणे पृथ्वीच्या आकाराएवढा आहे. (PC:NASA)

शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, या ग्रहावरही पृथ्वीप्रमाणे डोंगराळ भाग आहे. (PC:NASA)

नासाने ट्रांसिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (TESS) च्या मदतीने या नवीन ग्रहाच्या आकाराचा शोध लावला आहे. (PC:NASA)

अंतराळामध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत, असं बोललं जातं. जगभरातील अनेक वैज्ञानिकांकडून याबाबत संशोधन सुरु आहे. (PC:NASA)

आता अमेरिकन अंतराळ संस्था नासाने अंतराळातील आणखी एका रहस्यावरील पडदा उघडला आहे, असे म्हणावे लागेल. (PC:NASA)

हा ग्रह पृथ्वीच्या व्यासाच्या 99 टक्के आहे. दरम्यान, शास्त्रज्ञ अद्याप हा ग्रहावरील वातावरण आणि रचना याबद्दल अनिश्चित असून त्याबाबत अधिक अभ्यास आणि संशोधन सुरु आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button