ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन, सरकारी बसमधून प्रवास
आता राज्यातील ज्येष्ठ वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत देवदर्शनाचा प्लॅन आखला जात आहे. त्यासाठी, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाल्याची माहिती आहे. त्यानुसार, ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना एसटीने मोफत देवदर्शन घडविण्यात येणार आहे.
राज्यातील महत्त्वाची तिर्थक्षेत्र मानली जाणीरे देवस्थाने या मोफत पर्यटनात असणार आहेत. त्यामध्ये, पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी,शेगाव, कोल्हापूर -जोतिबा दर्शन या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या धर्मशाळा,यात्रीनिवास येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव खोल्या देखील ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या राज्यात 65 वर्षावरील नागरीकांना 50 टक्के तिकीट तर 75 वर्षांवरील नागरीकांना मोफत प्रवास जाहीर करण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून देवदर्शनासाठी जो प्रस्ताव करण्यात येतं आहे त्यामध्ये सर्वच जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. याबाबत एबीपी माझा या वेबसाईने वृत्त दिले आहे.
दरम्यान, मोफत देवदर्शन यात्रेसाठी सुट्टीचा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांचे नियोजन करण्यात येत आहे. कारण, सुट्टीचा दिवस असल्याने दैनंदिन प्रवास करणारे आणि बहुदा प्रवाशांची संख्या कमी असते. त्यामुळे, एसटीच्या उत्पन्नात घट होते. त्यामुळे, शनिवार आणि रविवारी ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनासाठी मोफत पाठवता येईल का, स्थानिक पातळीवर त्याचे कसे नियोजन करता येईल, यासंदर्भात बैठक घेण्यात आली असून लवकरच ही देवदर्शन यात्रा घडवण्याचं काम सुरू होईल, अशी माहिती आहे.