सहा मुलांचा पिता असतांना तरुणीसोबत शरिरसंबंध बलात्काराचा गुन्हा दाखल
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/01/Screenshot_20230112_155924-1.jpg)
जळगाव : अगोदरच विवाहीत आणि सहा मुलांचा पिता असतांना तरुणीसोबत शरिरसंबंधातून तिन अपत्य झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्यासह इतर सहा जणांना सह आरोपी करण्यात आला आहे. संजय मुंशी बारेला याच्यासह मुंशी भारता बारेला, सौ. सनबाई मुंशी बारेला, कमलेश मुंशी बारेला, सुशिला कमलेश बारेला, चेतन मुंशी बारेला आणि सौ. पिंकी संजय बारेला सर्व रा. बोराजंटी ता. चोपडा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.
सन 2016 ते 2021 या कालावधीत 29 वर्षाच्या तरुणीला संजय बारेला याने लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी शरीरसंबंध निर्माण केले. परिणामी त्याच्यापासून तरुणीला तिन अपत्य झाले आहेत. संजय बारेला हा अगोदरच विवाहीत असून त्याला पहिल्या पत्नीपासून एकुण सहा अपत्य आहेत. दिशाभुल करुन तिच्यासोबत भांडण, शिवीगाळ, मारहाण आणी बलात्कार केल्यानंतर तिला इतर सदस्यांनी संगनमत करत घरातून बाहेर काढुन माहेरी पाठवून दिले. या घटनेत तिची फसवणूक आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अमरसिंग वसावे करत आहेत.