बीड जिल्हाधिकारी साहेब बिंदुसरा संवर्धनासाठी नदीपात्रात दाखल ,सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची दखल
अखेर जिल्हाधिकारी साहेब बिंदुसरा संवर्धनासाठी नदीपात्रात दाखल ,सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची दखल
सामाजिक कार्यकर्ते यांनी “जिल्हाधिकारी साहेब बिंदुसरेला जाणुन घ्या “अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांतून ठळक बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी बीड राधाबिनोद शर्मा यांनी बिंदुसरा नदीच्या संवर्धनाकडे लक्ष दिले असून आज दि.७ जानेवारी शनिवार रोजी सकाळीच बिंदुसरा नदीपात्रात मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांच्यासह दाखल झाले आहेत तसेच नदी संवर्धनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य बीडकरांसह सामाजिक संस्था सोबत बैठक घेणार आहेत.
“जला जाणुन घेऊ या ” अभियानांतर्गत मांजरा नदीच्या संवर्धनासाठी संवादयात्रा जनजागृती सुरू असतानाच बीड शहरातुन वाहणा-या बिंदुसरानदीची बकाल अवस्था,अस्वच्छता,अतिक्रमण यामुळेच दि.०२ जानेवारी सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह सहका-यांनी “संवर्धनासाठी बिंदुसरा नदीला जाणुन घ्या जिल्हाधिकारी साहेब “आंदोलन करण्यात आले होते. याविषयी प्रसारमाध्यमांतून मोठ्याप्रमाणात या विषयाचे गांभीर्य जिल्हाप्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अखेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बिंदुसरा नदी स्वच्छ होणे काळाची गरज असून या उपक्रमात सर्वसामान्य बीडकरांसह सामाजिक संस्थांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोट
_
हिंगोली येथे कार्यरत असताना नदी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले होते. बीड मध्ये आल्यानंतर पुलावरून बिंदुसरा नदीचा थांबलेला प्रवाह पाहिला होता तेव्हाच या नदीचे रूप बदलण्याचा संकल्प केला होता. मात्र मध्यंतरी या कामाकडे लक्ष देता आले नाही. आता मात्र ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. नागरीकांनी देखील यामध्ये सहभागी व्हावे. :- राधाबिनोद शर्मा,जिल्हाधिकारी बीड
कोट
__
बिंदुसरा नदीपात्रातील अतिक्रमण त्यामुळेच नदीचे पात्र अरूंद झाले असून भविष्यात महापुराची आपत्ती ओढावल्यास मोठ्याप्रमाणात जिवित व वित्तहानी होऊ शकते तसेच नदीपात्रातील कचरा व घाण पाणी सोडण्यात आल्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून नदीपात्राची स्वच्छता करून अतिक्रमण प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर तसेच कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी. डाॅ.गणेश ढवळे