ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कपाशी बियाण्याच्या १० लाख ७२ हजार पाकिटांची मागणी


मराठवाड्यातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात १ लाख ९५ हजार हेक्टरवर कापूस लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी महाबीज तसेच खासगी क्षेत्रातील विविध बियाणे उत्पादक कंपन्याकडे बी.टी. (बीजी २) कपाशीच्या बियाण्याच्या १० लाख ७२ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.



परभणी जिल्ह्यातील २०१७-१८ ते २०२१-२२ या ५ वर्षातील कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९५ हजार ८७६ हेक्टर आहे. गतवर्षी (२०२३) जिल्ह्यात १ लाख ७९ हजार ४४७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. गतवर्षी विविध बियाणे उत्पादक कंपन्यांकडून बीटी कपाशी बियाण्याच्या १० लाख १७ हजार पाकिटांचा पुरवठा करण्यात आला होता.

तालुका – २०२२ लागवड क्षेत्र – २०२३ प्रस्तावित क्षेत्र- बियाणे पाकिटे मागणी

परभणी – २५१०१ – २७१००- १४९०५०

जिंतूर – २९५१३ – ३०८०० – १६९४००

सेलू – ३२०८४ – ३२४००- १७८२००

मानवत- २४५५३ – २५००० – १३७५००

पाथरी- १६४३२ – १७४५० – ९५९७५

सोनपेठ- १५७३६ – १६०००- ८८०००

गंगाखेड – २४२२३ – २६२००- १४४१००

पालम- १३७५०- १४७५०- ८११२५

पूर्णा- ४२५५ – ५३०० – २९१५०

परभणी जिल्हा कंपनीनिहाय कपाशी बियाणे पाकिटे पुरवठा मागणी स्थिती

कंपनीचे नाव- वाण- २०२२ मधील पुरवठा – २०२३ मधील मागणी

अजित- १५५- २६०००- ३२०००

अजित – १९९ – ७०००- ८०००

अजित – १११- ५००० – ७०००

नुजीविडू- मल्लिका – १७०००- १६०००

नुजीविडू – भक्ती- १३०००- १६०००

नुजीविडू- राजा- ३१०००- ३८०००

नुजीविडू- बलवान- ६०००- ७००

महिको- ७३५१- ६००० – १३०००

मोन्सॅन्टो – ब्रम्हा- ७५००- ९५००

राशी – ६५९ – ८८०००- .९८०००

राशी- ७७९ – ४७०००- .५२८५०

अंकुर -३०२८ – १३००००- १४४५०

अंकुर – जय – १६२०००- ३००००

ग्रीन गोल्ड – विठ्ठल- ३२०००- ३२०००

कावेरी – जादू- १६०००- १७५०००

इतर – सर्व बीटी- ४११५०० – ५१७५००


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button