यावर्षी ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार सुरु राहणार
यावर्षी ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार (Bar Timings For Christmas And 31st December 2022) सुरु राहणार आहेत, तर वाईन शॉप रात्री १ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.
मुंबई: नाताळ (ख्रिसमस) (Christmas) आणि विशेषत: ३१ डिसेंबरला (31st December Celebration) हॉटेल आणि बार किती वाजेपर्यंत चालू राहणार हा प्रश्न दरवर्षी मद्यप्रेमींना पडलेला असतो. आता या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. यावर्षी ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार (Bar Timings For Christmas And 31st December 2022) सुरु राहणार आहेत, तर वाईन शॉप रात्री १ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून यासंदर्भातलं परिपत्रक नुकतंच जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता रात्रभर मद्यप्रेमींची पार्टी चालणार यात शंकाच नाही.
इतर वेळी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, बार आणि पब्स ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. तर वाईन शॉप्सना रात्री १ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वर्षाचे स्वागत अनेकांना जल्लोष साजरा करत करायचे असते. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असून, यामुळे मुंबईला एक पर्यटनस्थळ म्हणूनही चालना मिळते. या दिवशी पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याची विनंती करण्यात आली असल्याचीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान बारच्या वेळेत वाढ करण्यात आली असली, तरी बार आणि पब चालकांना अद्याप पोलिसांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. पोलीस महासंचालकांना यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या अध्यक्षांनी दिली आहे.