अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने शुटिंगस्थळी आत्महत्या केल्याने एकच खळबळ

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने शुटिंगस्थळी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरणी तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी अभिनेता शीजान खान याच्याविरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून शीजान खानविरोधात भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शीजान खानला रात्री उशिरा अटक केली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शीजान खानला रात्री उशिरा अटक केली. मध्यरात्री त्याची वैद्यकिय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला वालीव पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. सोनी सब चॅनेरवरील अलिबाबा या मालिकेत तुनिशा ही मुख्य भूमिकेत होती तर शीजान खान मुख्य भूमिकेत होता. या दोघांमध्ये प्रेम संबंध असून त्यानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तुनिशा हिच्या आईने दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तुनिशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आण्यात आला आहे. आज सकाळी तिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जाणार आहे.

तुनिशाने सीरियलच्या सेटवर ज्या मेकअप रुममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. तो रुम शीजानचा आहे. शुटिंग करून परत आलो तेव्हा मेकअप रुमचा दरवाजा आतून बंदच होता. दरवाजा न उघडल्याने तो तोडून आत शिरलो. त्यावेळी तुनिशाने आत्महत्या केल्याच आढळून आल्याचं शीजानने सांगितलं.

दरम्यान, शीजानला आज वसई कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तुनिशा आणि शीजान दोघेही रिलेशनमध्ये होते. काही दिवसांपूर्वी शीजान आणि तुनिशाचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे तुनिशा प्रचंड तणावाखाली होती. त्यातूनच तिने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं.

तुनिशाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट मिळाली नाही. या प्रकरणाचा हत्या आणि आत्महत्या या दोन्ही अँगलने तपास केला जात आहे. नायगाव येथील टीव्ही सीरियलच्या सेटवरील स्टाफ आणि इतरांची चौकशी केली जाणार आहे.

तुनिशा मुंबईत तिच्या आईसोबत राहत होती. शीजान आणि तुनिशाचे प्रेमसंबंध होते. शीजानच्या त्रासामुळेच तुनिशाने आत्महत्या केली आहे, असा आरोप वनिता शर्मा यांनी केला आहे.