काँग्रेस नेते राजा पटेरिया यांचे वादग्रस्त विधान करणारा व्हडिओ समोर आला आहे. यामध्ये ते ‘पीएम मोदींच्या हत्येबद्दल बोलत आहेत. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
भारत जोड़ो या भारत जलाओ ? – संविधान बचाना है तो मोदी की हत्या करने के लिए तैयार रहो – एमपी कांग्रेस नेता राजा पटेरिया pic.twitter.com/aBxSnEDXjL
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) December 12, 2022
पण राजा पत्रिया यांनी नंतर आपले वक्तव्य मागे घेतले. पुढच्या निवडणुकीत मोदींचा पराभव करायचा आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, मी पटेरिया जी यांचे वक्तव्य ऐकले, हे स्पष्ट झाले की ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही.
काँग्रेस पक्षानेही हा वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी म्हणाले की पटेरिया यांनी आधीच स्पष्टीकरण जारी केले आहे.
मात्र, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेस नेत्याविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या सूचना राज्य पोलिसांना दिल्याची माहिती आहे. पटेरिया यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे सांगत मिश्रा म्हणाले की, कठोर कारवाई केली जाईल.