परळीत आ.विक्रम काळे यांची नाथ शिक्षण संस्था कार्यालयास भेट
परळीत आ.विक्रम काळे यांची नाथ शिक्षण संस्था कार्यालयास भेट
सदस्य नोंदणीसह शिक्षकांच्या प्रश्नावर झाली चर्चा
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी शुक्रवार दि.9 डिसेंबर रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट दिली यावेळी संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्याशी आगामी निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी संदर्भात चर्चा केली.तसेच शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी गुंतवले असल्याने इतर कामांची सक्ती करु नये अशा सुचना तहसिलदार सुरेश शेजुळ यांना दिल्या.
शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे हे शुक्रवारी परळी येथे आले असता नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट दिली यावेळी सहसचिव प्रदिप खाडे व सहकार्यांनी त्यांचे स्वागत केले.शिक्षक मतदार संघाची निवडणुक जवळ आलेली असल्याने मतदार नोंदणी,संपर्क अभियान याषोबतच शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरु असुन या निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती केली असल्याने अध्यापनावर परिणाम होत आहे.शिक्षकांच्या एका शिष्टमंडळाने आ.काळे यांची भेट घेवुन हा प्रश्न मांडताच त्यांनी तहसिलदार सुरेश शेजुळ यांना निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक केलेले शिक्षक व शाळा याचा समन्वय साधून याचा अध्यापनावर परिणाम होणार नाही असे नियोजन करावे अशा सुचना केल्या.यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे, प्राचार्य अतुल दुबे, डी. जी. शिंदे, बालासाहेब देशमुख, प्रा.शंकर कापसे, आघाव सर, फड सर व इतर आदींची उपस्थिती होती.