भारतीय संविधान हे जगातले आदर्श संविधान – नानाभाऊ हजारे उपशिक्षणाधिकारी
भारतीय संविधान हे जगातले आदर्श संविधान – नानाभाऊ हजारे उपशिक्षणाधिकारी
वडवणी प्रतिनिधी :- भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप परिश्रम घेतले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात सर्वांना समान हक्क व अधिकार दिले . माणसाने माणूसपणाने राहण्यासाठी हे संविधान आहे . त्यामुळे भारतीय संविधान आदर्श संविधान आहे असे मत बीड येथील उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे यांनी व्यक्त केल.
सामाजिक समता अभियान आयोजित वडवणी येथे संविधान गौरव परिषद उत्साहात पार पाडली. यावेळी उद्घाटक म्हणून बीडचे उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे हे उद्घाटन सत्रात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक समता अभियान चे महासचिव प्रा. शशिकांत जावळे तर प्रमुख व्याख्याते म्हणून उपप्रचार्य श्रीकिशन मोरे हे होते. यावेळी प्रा.डॉ. विठ्ठल जाधव सामाजिक समता अभियान कार्याध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिषदेची भुमिका मांडताना समाजात संविधान संस्कृती रुजवणे गरजेचे आहे.यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेअसे म्हटले.प्रमुख व्याख्याते श्री किशन मोरे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी संविधानातील प्रत्येक कलम आणि त्या कलमाचे महत्त्व विशद करून पटवून देण्याचा प्रयत्न केला. या सत्राचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत जावळे सामाजिक समता अभियान चे महासचिव यांनी अध्यक्षीय समारोप करताना सामाजिक समता अभियान ची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी ते म्हणाले प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक समता अभियान गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्ते सामाजिक समता निर्माण करण्यासाठी समतेसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी महापुरुषांचे विचार अंगीकारून त्या महापुरुषाचे विचार गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावे, महापुरुषांच्या विचारातूनच सामाजिक समता निर्माण होते असे त्यांनी सांगितले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे नगरसेवक भिमराव उजगरे, बांधकाम सभापती बाबासाहेब वाघमारे, अॅड. भास्कर उजगरे, सौ. शिलाताई उजगरे , प्रा.ईश्वर डोंगरदिवे , एस.पी. राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रामध्ये संविधान कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी प्रा. राहुल सुरवसे होते. यावेळी कवी राहुल वाडेकर ,आनंद वाहुळे, अनंत कराड, प्रा. संजय कांबळे , प्रा. विनोद गलांडे, प्रा.आत्माराम झिंजुर्डे प्रा डॉ विठ्ठल जाधव, प्रा. प्रकाश खळगे सह अनेक कवींनी आपल्या कवितेचं वाचन केलं.
समारोप सत्रांचा अध्यक्षीय समारोप सामाजिक समता अभियान चे अध्यक्ष प्रवीणकुमार डावरे यांनी केला. त्यावेळी ते म्हणाले भारतीय संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही संविधानाच्या लाभार्थ्यांची आहे. जनतेच्या मतावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी संविधानाची अंमलबजावणी करावी आणि संविधानाचे दुसरे लाभार्थी नोकरदार वर्गाने संविधानाची जागृती करावी तरच संविधान सभ्यता खऱ्या अर्थाने निर्माण होईल असे ते म्हणाले. या प्रसंगी सामाजिक समता अभियान चे मराठवाडा अध्यक्ष प्रा. नारायण घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण संविधान जलसा निकाळजे प्रमोद आणि त्यांचा संच यांनी आपल्या सुमधुर आवाजातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. शिव फुले शाहू आंबेडकरांच्या गीतातून प्रबोधन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.आत्माराम झिंजुर्डे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश खळगे सर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून करण्यात आली.
या प्रसंगी अरविंद लोंढे, विजय राऊत, प्रा. गणेश खोपे ,प्रा.डाॅ.धम्मपाल उघडे,गुलाबराव भोले, कॅप्टन आठवले , राऊत, प्रभाकर साळवे, सोनसळे सर , आकाश वाघमारे, राहूल सरवदे आदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.लक्ष्मण वाघमारे सर, प्रा. प्रकाश खळगे, बाबासाहेब साळवे,कैलास उजगरे,आबासाहेब जावळे,पवन उजगरे व त्यांची टिम आदींनी अथक परिश्रम घेतले.