ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

जीवघेण्या रेबीज आजाराबाबत सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल. डॉक्टरांना इशारा.


मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी रेबीज एक जीवघेणा विषाणूजन्य रोग आहे जो रेबीड अॅनिमल्स (rabid animals)(प्रामुख्याने कुत्रे) यांच्या चावल्याने पसरतो.हा नोटीफिएबल डिसीज (notifiable disease) म्हणजेच ज्याची सूचना सरकारी अधिकाऱ्यांना देणे कायद्याने आवश्यक असेल असा रोग असल्याची घोषणा सरकारने केली आहे.

त्यामुळे आता रेबीजचा संशयित रुग्ण दाखल झाल्यावर डॉक्टर आणि रुग्णालयांना त्याबद्दल आरोग्य विभागाला सूचित करावे लागेल. तसेच भौगोलिक क्षेत्रातून रेबीजचे प्रतिबंध, नियंत्रण आणि निर्मूलन केवळ योग्य देखरेख आणि डिसीज रिपोर्टींग सिस्टीमच्या मदतीने साध्य केली जाऊ शकते, असे मंगळवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

भारतात रेबीजमुळे दरवर्षी 20,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो, यामध्ये 60% प्रकरणे 15 वर्षाखालील मुलांमध्ये आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की महाराष्ट्रात दरवर्षी किमान 200 रेबीज मृत्यू होतात, परंतु आरोग्य अधिकार्‍यांकडे फक्त 20 नोंदवले जातात.

 

तर मुंबईत, कुत्रा चावण्याचे प्रमाण हे 2018 मध्ये 85,438 वरून 2021 मध्ये 61,332 पर्यंत कमी झाले आहे आणि गेल्या पाच वर्षात रेबीजने एकही मृत्यू झालेला नाही. 2030 पर्यंत रेबीजचे उच्चाटन करण्यासाठी जागतिक पातळीवर हालचाली सुरू आहेत, परंतु भारतात तो केवळ गोवा, अंदमान आणि सिक्कीममध्येच संपुष्टात आला आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button