शाळकरी मुलींना सेक्स वर्कर बनवले जात असल्याची धक्कादायक माहिती
इतर देशातील मुलींची परिस्थिती पाहता आपण खरंच सुखी आणि सुरक्षित आहोत. हाच विचार येतो. कारण,आता आम्ही जे सांगणार आहोत ते वाचून तूम्हालाही हेच वाटेल.
उत्तर कोरीयात शाळकरी मुलींना सेक्स वर्कर बनवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हो तूम्ही बरोबर वाचले. जिथे मुलींना सुरक्षा मिळावी यासाठी संपूर्ण जगभरात नवे नियम बनवले जात आहेत. तिथे हे असे चित्र समोर येणे म्हणजे भयावह आहे.
उत्तर कोरिया हा हुकूमशाही पद्धतीचा देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर कोरियातील अल्पवयीन शाळकरी मुलींसोबत चुकीचे वागले जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. त्यांना शाळेतून उचलून प्लेजर स्क्वॉडद्वारे सेक्स स्लेव्ह म्हणजे वैश्या बनवले जात असल्याची माहिती उत्तर कोरियातून पळून गेलेल्या मुलींच्या मुलाखतींमध्ये सांगितली आहे.
कोरियात शाळेत जाणाऱ्या अनेक मुलींची यासाठी निवड केली जाते. या मुलींचे ‘प्लेजर स्क्वाड’ नावाचे पथक तयार केले जाते. हे पथक उत्तर कोरियातील उच्च अधिकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी तयार केले जाते. प्लेजर स्क्वॉड 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना भरती करते. सरकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी या मुलींचा वापर होतो.
एका इंग्रजी वेबसाईटचा दावा आहे की, उत्तर कोरियाच्या सैन्यातील लष्कर सैनिक या मुलींची निवड करतात. या निवडलेल्या मुली कोरियातील उच्च श्रेणीतील लोकांच्या सेक्स पार्ट्यांमध्ये पाठवल्या जातात. या मुलींच्या पथकाला किम जोंग-उनचे प्लेजर स्क्वाड म्हणतात.
धक्कादायक बाब अशी की, या मुली निवडल्यानंतर त्यांची कौमार्य चाचणी देखील केली जाते.तसेच, मुलींना कोणता आजार नाही ना याचीही तपासणी केली जाते. या सर्व गोष्टी तपासून मुली त्या पथकात समाविष्ठ केल्या जातात.
काय आहे यामागील इतिहास
मुलींना मनोरंजनाचे साधन बनवण्याचा उत्तर कोरियाचा जुना इतिहास आहे. किम जोंग यांच्या आजोबांनी ही परंपरा सुरू केली. त्यानंतर किमच्या वडिलांनी या परंपरेला सुरू ठेवण्यात अधिकच भर दिला. परदेशात शिक्षण पूर्ण करणाऱ्या किमकडून लोकांना या परंपरेत बदल अपेक्षित होता. पण किमही आपल्या आजोबा आणि वडिलांचा मार्गावर चालत ही परंपरा पुढे नेत आहे.
‘आय वॉज किम जोंग इल कुक’ नावाचे एक पुस्तक आहे. ज्यामध्ये उत्तर कोरियाच्या सेक्स स्लेव्ह्सबद्दल बरेच उल्लेख आहेत. या पुस्तकात 14 ते 30 वयोगटातील मुली वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. काही मनोरंजनासाठी तर काही मसाजचे काम करतात. एक वय पूर्ण झाल्यानंतर त्यांना वेगळ्या विभागात पाठवले जाते. ज्यामध्ये स्वयंपाक, साफसफाईच्या कामांचा समावेश असतो.
या गटाला ‘प्लेजर गर्ल’ म्हणतात.
केवळ सुंदर आकर्षक दिसणाऱ्या मुलीच प्लेजर ग्रुपमध्ये सामील होतात. प्लेजर ग्रुपमध्ये सामील होणारी मुलगी त्यांचे मुळ आयुष्य पुन्हा जगू शकत नाहीत. हे या पुस्तकातून स्पष्ट होते. कारण उत्तर कोरियाच्या प्रशासनाला भीती वाटते की,त्या मूली अधिकाऱ्यांच्या गुप्त गोष्टी शेअर करू शकतात. निवडलेल्या मुलींना त्यांच्या कुटुंबापासून दूर वेगळ्या प्रकारच्या इमारतींमध्ये ठेवले जाते. तेथे त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात नृत्य, करमणूक, मसाज आणि मोठ्या लोकांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण दिले जाते.
दक्षिण कोरियाच्या नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसच्या माहीतीनुसार, किम त्याचे आजोबा आणि वडीलांच्याच मार्गावर हुकूमशाहीचा वापर करत आहेत. ते परदेशात शिकून आले असते तरी त्यांनी कोणतीही सुधारणा केलेली नाही.