आधार आश्रमातच निराधार मुलींवर अत्याचार
नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात 5 मुलींवर अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी या आश्रमात राहणाऱ्या एका मुलीने अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती.
पण तपासात 5 मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या आश्रमाचा संस्थाचालक संशयित हर्षल मोरे याने सहा मुलींवर अत्याचार केल्याचं उघडकीस आले आहे. आधार आश्रमात शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीवर आश्रमाच्या संस्थाचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली. आधार आश्रमातील इतर मुलींशीही या नराधमाने गैरवर्तन केलं असल्याचा पोलिसांना संशय आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असताना संशयित आरोपी हर्षल मोरे याचा पर्दाफाश झाला आहे
नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील द किंग फाउंडेशन संचलित आधार आश्रमात शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीवर आधार आश्रमाच्याच संचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात असलेल्या या अनाथ आश्रमात गोरगरीब आणि बेघर मुलं आणि मुली निवासी म्हणून वास्तव्य करताय. मात्र याच गरिबीचा फायदा घेत या संस्थेच्या संचालकाने या संस्थेत वास्तव्यास असलेल्या एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
या मुलीने आश्रमातून पळ काढून तिच्या नातेवाईकांना ही घटना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोस्को बलात्कार आणि ॲट्रॉसिटी चाही गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. ऑक्टोबर महिन्यात या नराधमसंचालकाने पीडित मुलीला पाय दाबण्याच्या पाहण्याने आपल्या खोलीत बोलावून घेतलं आणि तिच्यावर बलात्कार केला हा नराधम इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुन्हा नोव्हेंबर महिन्यात या मुलीला त्याच्या खोलीत बोलावून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी या मुलीने या आश्रमातून पळ काढून घडलेला प्रकार नातलगांसमोर कथन केला आणि हा संतापजनक प्रकार समोर आला.
धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात या नराधमाने या अनाथ आश्रमात शिकणाऱ्या इतर मुलींचीही गैरवर्तन केल्याचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी या संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे नामक नराधम संचालकाच्या काही तासातच मुसक्या आवळल्या आहे. सदर संस्था नोंदणीकृत संस्था नसल्याची शक्यता आहे. आधार आश्रमाच्या नावाखाली गोरगरीब आणि बेघर मुलींना सहारा द्यायचा आणि नंतर त्यांच्या अजाणतेपणाचा आणि गरीबीचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार करायचा हा गोरखधंदाच सुरू होता का? याही अंगाने पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जातोय त्यामुळे आता पोलीस तपासात या प्रकरणाचा कोणकोणत्या धक्कादायक बाबी समोर येता आणि पोलीस किती कठोर कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.