क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

श्रद्धा वालकरच्या हत्येची पुनरावृत्ती भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका हिंदू मुलीची हत्या


पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये श्रद्धा वालकरच्या हत्येची पुनरावृत्ती घडली आहे. चंदीगडमधील बुरैल भागात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका हिंदू मुलीची हत्या करण्यात आली आहे. या संमंधीचे व्रत्त news 18 लोकमत ने प्रसारी केले आहे त्यानुसार
हिंदू तरुणीच्या हत्येप्रकरणी एका मुस्लिम तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुणीच्या शेजारी राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, आधीच विवाहित मुस्लिम तरुणाने शेजारी राहणाऱ्या हिंदू तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तरुणीने तरुणाशी बोलणे बंद केल्यावर त्याने तिची हत्या केली. ममता असे 18 वर्षांच्या मृत तरुणीचे नाव आहे.

ही तरुणी मूळ यूपीच्या हरदोईच्या बेनीगंज तालुक्यातील आहे. तर बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेला गावात राहणारा 25 वर्षीय मोहम्मद शारिक असे आरोपीचे नाव आहे. मुलीची आई चंपा हिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सेक्टर-45 येथून अटक केली. त्याच्याकडून कपड्यांनी भरलेली बॅगही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ममता सोमवारी घरी एकटीच होती. तिची आई कामावर गेली होती, तर लहान भाऊ शाळेत गेला होता. त्याचवेळी आरोपीने घरात घुसून मुलीचा गळा आवळून खून केला. सायंकाळी आई घरी परतली तेव्हा मुलगी बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती.

तिचे केस विस्कटलेले होते आणि कानातून रक्त येत होते. आईने तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
ममताला आरोपी विवाहित असल्याचे सहा महिन्यांपूर्वी समजले. यानंतर तिने मोहम्मद शारिकपासून अंतर ठेवले.

यानंतर तो तरुण तिच्या मागे लागला, यामुळे ममता खूप तणावात होती. दीड महिन्यापूर्वी मुलीने तिच्या आईला आरोपी शारिकबाबत सांगितले. ममता त्याच्याशी फोनवरही बोलल नसे. त्यामुळे तो रागात होता.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शरीक फूड डिलिव्हरीचं काम करतो आणि तीन वर्षांपूर्वीच तो चंदीगडला आला होता. सुमारे अडीच वर्षांपासून ते बुरैल येथे भाड्याच्या घरात राहत होते. ममता त्याच्या शेजारी कुटुंबासह राहत होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button