ताज्या बातम्यादेश-विदेशधार्मिकमहत्वाचेराजकीयलोकशाही विश्लेषणसंपादकीय

प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या कळसावर भगवा फडकला, अयोध्येत ‘धर्मध्वजा’चा ऐतिहासिक सोहळा…


 

आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरावर भगवा ध्वज फडकावला. अभिजित मुहूर्ताच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान मोदींनी अवघ्या 10 सेकंदात ध्वजारोहण केलं.

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे राज्यपाल, मुख्यमंत्री योगी आणि देखील या समारंभाचे साक्षीदार होते.

 

धर्मध्वज डौलात फडकला

आयोध्या आज पुन्हा सजलं आहे. आयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर आज मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा डौलात फडकला आहे. धर्मध्वजारोहणाचा सोहळा आज पार पडला आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आलं आहे.

महत्त्वाचा संदेश ही धर्म पताका देईल

भगवान श्रीराम हे त्यांच्या स्थानावर अयोध्येत विराजमान आहेत. ही ध्वजा जगभरातील श्रद्धाळू, राम भक्तांसाठी एक संदेश आहे की, आता रामलल्लांचे भव्य मंदिर पूर्ण झाले आहे. हा महत्त्वाचा संदेश ही धर्म पताका देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन तर 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली होती.

 l l


l

मोदींचा अयोध्येत रोड शो

आज दुपारी जवळपास 12 वाजता श्री राम लल्लाच्या पवित्र मंदिराच्या शिखरावर केसरी रंगाच्या ध्वाजे विधिवत आरोहण करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचा आयोध्येत रोड शो झाला. त्यावेळी नागरिकांची दुतर्फा मोठी गर्दी दिसून आली.

ध्वजाची मोठी परंपरा

स्थानिक संतांनुसार, रघुवंशात ध्वजाची मोठी परंपरा राहिलेली आहे. भगवान राम यांच्या वंशासाठी कोविदार वृक्ष याला काही जण कांचन, रक्त कांचन, देवकांचन, वनराज, रक्तपुष्प असेही म्हणतात, हा वृक्ष प्रतिक म्हणून या ध्वजावर दिसेल. या वृक्षाला जांभळी फुलं येतात.

ध्वजावर तीन प्रतिकं

या ध्वजावर तीन प्रतिकं आहेत. त्यात सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष यांना विशेष स्थान देण्यात आलं आहे. या केशरी रंगाचा ध्वज कित्येक किलोमीटर दुरूनच दृष्टीपथास पडेल. ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान घंटानादाने आयोध्यानगरीत भक्तीची स्पंदनं उसळले.

ध्वजाचं वैशिष्ट्ये

राम मंदिराच्या नवीन ध्वजामध्ये मंदिराच्या मुख्य शिखराची उंची समाविष्ट आहे. हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रूंद आहे. या ध्वजाचं वजन हे 2 ते 3 किलोग्रॅम आहे. 161 फूट उंच मंदिर शिखर आणि त्यावरील 42 फूट उंच ध्वजदंडानुसार हा ध्वज तयार करण्यात आला आहे.

ध्वजावर कोणताच परिणाम होणार नाही

हा ध्वज हाताने शिवून तयार होण्यासाठी 25 दिवस लागले. हा ध्वज एव्हिएशन ग्रेड पॅराशूट नायलॉन आणि रेशमपासून तयार करण्यात आला आहे. पॅराशूट ग्रेड नायलॉनमध्ये सिल्क सॅटिनच्या धाग्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि हवामानातील बदलाचा त्यावर लागलीच परिणाम होणार नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button